वसई : महाराष्ट्रात बंदी असलेला गुटखा पकडण्याची मालिका मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुरूच असून विरार पोलिसांनी एका आयशर टेम्पोसह लाखोंचा गुटखा जप्त केला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार २ डिसेंबरच्या पहाटे शिरसाड येथे गुजरातहून येणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी या ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये रजनीगंधा, भोला छाप, भोला जर्दा असा लाखोंचा माल गोण्यांमध्ये भरलेला आढळून आला. यामध्ये चालकासह एका आरोपीला अटक करण्यात आली असून सुमारे २२,६७,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. महाराष्टÑात बंदी असल्यामुळे गुटख्याच्या काळ्याबाजारातून मोठी प्राप्ती होत असल्याने गुटख्याची तस्करी प्रचंड प्रमाणावर होते आहे. या कारवाई सत्रामुळे त्यात सध्या काहीशी घट झाली आहे. पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे .
महामार्गावर लाखोंचा गुटखा वाहतूक पोलिसांनी पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2018 01:37 IST