शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जव्हार, मोखाड्यातील दुष्काळाने पालकमंत्री ठरणार सर्वांचे लक्ष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 00:47 IST

२०१९ ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांचे चित्र मार्च महिन्याच्या दरम्यान स्पष्ट होणार असले तरी सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत.

- रविंद्र साळवेमोखाडा : २०१९ ला होऊ घातलेल्या लोकसभा निवडणूकांचे चित्र मार्च महिन्याच्या दरम्यान स्पष्ट होणार असले तरी सर्वच राजकीय पक्ष आतापासूनच गुडघ्याला बाशिंग बांधून तयारीला लागले आहेत. ते पालकमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदार संघातील जव्हार मोखाडा हे आदिवासी तालुके दुष्काळी असतांना शासनाने सॅटेलाईटद्वारे केलेला सर्व्हे व महसूल विभागाने सुरवातीला आणेवारी ५० टक्क्यांपेक्षा अधिक दाखविल्यामुळे जव्हार मोखाडा हे तालुके दुष्काळी तालुक्यांच्या यादीतून डावलले गेले यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत दुष्काळाबाबत पालकमंत्र्यांची उदासीनता या निवडणुकीत कळीचा मुद्दा ठरणार असून विरोधकांना जव्हार मोखाडयातील जनतेला आकर्षित करण्यासाठी आयते - कोलीत मिळणार आहे पावसाने अडीच महिने हुलकावणी दिल्याने शेतीला आवश्यक पाणी मिळाले नाही यामुळे पिकाऐवजी गवताची पेंढी हाती आल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी उभे भात पीक पेटवून दिले. यानंतर पालकमंत्र्यांनी शेतक-याच्या बांधावर जाऊन भात पिकांची पहाणी केली तरी देखील जव्हार, मोखाडा हे तालुके दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत समाविष्ट केले गेले नाहीत.>सर्व पक्षांनी धरले होते विष्णूंना धारेवरशिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉग्रेस ने जव्हार मोखाडा तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा, यासाठी होळी आंदोलन करून, बोंबाबोंब करीत १९ नोव्हेंबरला शिमगा साजरा केला होता यानंतर अंतिम आणेवारी आल्यानंतर १५ डिसेंबर पर्यंत जव्हार, मोखाडा दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले जातील असे अश्वासन देण्यात आले. परंतु हे आश्वासन नेहमीप्रमाणे हवेत विरल्याने येथील आदिवासींकडून पालकमंत्र्यांच्या विरोधात प्रचंड प्रमाणावर असंतोष खदखदतो आहे. यामुळे निवडणुकांमध्ये पालकमंत्री दुष्काळाच्या प्रश्नावरु न लक्ष्य होणार हे मात्र नक्की.