मुंबई : एकुलत्या एक मुलीला डॉक्टरांनी ब्रेनडेड घोषित केल्यानंतर मोठय़ा धीराने ‘मला तिचे अवयव दान करायचे आहे’, अशी इच्छा आईने अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी व्यक्त केली. त्यांच्या या निर्णयामुळे दोनजणांना जीवनदान मिळाले आहे.
राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या आणि मुंबईच्या माजी महापौर अॅड. निर्मला सामंत-प्रभावळकर यांची कन्या हेमांगी हिचा मृत्यू झाला. हेमांगी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होती. तिला अचानक तीव्र डोकेदुखीचा त्रस जाणवू लागला. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान हेमांगी कोमात गेली.
तिच्या मेंदूत रक्तस्त्रव झाला होता. दुस:या दिवशी डॉक्टरांनी तिला ब्रेनडेड घोषित केले. तिच्या सर्व अवयवांचे कार्य सुरू होते, म्हणूनच सामंत -प्रभावळकर यांनी तिच्या यकृत, किडनी, डोळे या अवयवाचे दान करायचे ठरवले. असे करून त्यांनी एक नवीन आर्दश समाजासमोर ठेवला आहे. हेमांगीचे यकृत एका 68 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला देण्यात आले असून किडनी 38 वर्षीय व्यक्तीला देण्यात आली आहे.
हेमांगी अभ्यासात खूप हुशार होती. महिलांवर होणा:या अत्याचारासंदर्भात आणि इतर विषयासंदर्भात राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय माहिती, आकडेवारी हवी असल्यास तीच मला इंट2रनेटवरून माहिती काढून द्यायची. 5 जून रोजी मी रात्री घरी येताना तिला आवडते म्हणून सॅण्डवीच घेऊन आले होते. तिने खाल्ले. थोडय़ा वेळाने म्हणाली, माङया डोक्याच्या मागच्या बाजूला दुखते आहे. तिला उलटय़ा झाल्या. मध्यरात्रीच तिला लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात
आले. तिच्या चाचण्या करण्यात आल्या.
यावेळी मेंदूमध्ये रक्तस्त्रव होत असल्याचे समजले. यानंतर ती कोमात गेली. यानंतर तिला ब्रेनडेड घोषित केले. जगात यावर काहीच उपचार नसल्याचे सांगितले. मग तिला अवयव रूपात जिवंत ठेवायचे ठरवले आणि तिच्या अवयवांचे दान केले, असे सामंत-प्रभावळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अवयव दान हेच खरे श्रेष्ठ दान
च्अवयव दान हेच खरे श्रेष्ठ दान आहे. माङया मुलींच्या अवयवाचे दान केल्यामुळे तीन गरजूंना त्याची मदत मिळाली आहे. त्यांना माङया मुलीच्या अवयवांमुळे जीवनदान मिळाले आहे. यापुढेही अवयव दानाची चळवळ उभी करणार असल्याचे ‘लोकमत’शी बोलताना निर्मला सामंत-प्रभावळकर यांनी सांगितले.