शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बोईसरमध्ये भरदिवसा प्रेयसीला घातली गोळी, तरुणाचीही आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2022 11:00 IST

बोईसर येथे एका तरुणाने प्रेयसीवर गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात तिचा जागीच मृत्यू झाला.

बोईसर : बोईसर येथे एका तरुणाने प्रेयसीवर गावठी कट्ट्यातून केलेल्या गोळीबारात तिचा जागीच मृत्यू झाला, तर गोळीबार करणाऱ्या तरुणाने एका वाहनाखाली उडी मारून आत्महत्या करण्याच्या प्रयत्न केला. त्यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

गोळीबाराची ही घटना प्रेमप्रकरणातून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. भरदिवसा घडलेल्या या गोळीबाराच्या घटनेने बोईसर परिसरात खळबळ माजली आहे. बोईसर-पालघर या मुख्य रस्त्यावरील बोईसर रेल्वे उड्डाण पुलाजवळील टीमा  रुग्णालयाच्या प्रवेशदवाराजवळ दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास कोलवडे गावात राहणाऱ्या कृष्णा यादव (वय २६) याने सरावली येथे राहणाऱ्या नेहा महतो (वय २१) या तरुणीवर सात बोअरच्या गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. त्यानंतर पळून जात असताना डी डेकोर कंपनीजवळ संरक्षण दलाच्या वाहनाखाली आरोपीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला टीमा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादारम्यान त्याचाही मृत्यू झाला.  

बोईसर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी नित्यानंद झा यांनी भेट दिली. घटनेचा तपास बोईसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कदम व सहायक पोलीस निरीक्षक सुरेश साळुंखे करीत आहेत. 

आरोपी तरुणाने गोळीबारानंतर स्वत:वरही गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गावठी कट्टा लॉक झाल्याने त्याने वाहनाखाली उडी मारली असता त्याच्या दोन्ही पायांना व डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी