शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

रोजगाराचा तिढा सोडवा हो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:01 IST

पालघर जिल्ह्यातील जव्हार हा आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका आहे. येथील नागरिकांना भेडसावणारी मुख्य समस्या

जव्हार : पालघर जिल्ह्यातील जव्हार हा आदिवासी लोकवस्ती असलेला तालुका आहे. येथील नागरिकांना भेडसावणारी मुख्य समस्या म्हणजे ^‘रोजगार’ येथील आदिवासी रोहयो मजुरांच्या पाचवीला पुजलेली समस्या आहे. दसरा झाला की येथील रोहयो मजुरांचे स्थलांतर व्हायला सुरवात झाली आहे. जव्हार ग्रामीण भागातून रोहयो मजुरांचे तांडेच्या तांडे मजुरीच्या शोधात निघतांना दिसत आहेत.ग्रामीणभागामध्ये कायस्वरूपी रोजगार मिळत नसल्याने अनेक समस्यांना तोड द्यावे लागत आहे. त्यामुळे ग्रामीण आदिवासी भागातील रोजगाराची समस्या सुटणार तरी कधी? असा सवाल आदिवासींकडून विचारला जात आहे.महाराष्ट्रात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेत शासनाच्या अधिकाºयांकडून मोठा गाजावाजा करून रोहयो मजुरांना काम दिल्याचा मोठा आकडा दाखिवण्यात येतो. मात्र त्या रोहयो मजुरांना रोजगार हमीवर काम मिळते का? तसेच रोजगार हमी मजुरांचे मस्टर काढून काम मिळते, तेही दोन ते चार दिवस काम मिळते. त्यामुळे येथील रोहयो मजुरांना कायमस्वरूपी रोजगार मिळतोतरी कुठे? असाही प्रश्न रोहयो मजुरांकडून विचारला जात आहे.जव्हार तालुक्यात रोहयो मजुरांची जॉबकार्ड धारक नोंदणी झालेली एकूण संख्या- १७ हजार ४०० च्या आसपास आहे. मात्र यापैकी सध्या हजार मजुरांनाही रोजगार दिलेला नाही. अशी अवस्था रोहयो मजुरांची झाली आहे. त्यामुळे शेकडो मजूर रोजगाराच्या शोधात निघायला सुरवात झाली असून, जव्हारच्या बस स्थानकात रोजगारासाठी मजुरांचे स्थलांतर होतांना दिसत आहेत.शासनाने महात्मा गांधी रोजगार हमी योजना २००५ वर्षापासून रोजगार हमी योजनेची सुरवात झाली. रोहयो मजुरांच्या मागणीनुसार वर्षभरात शासनाने रोहयो मजुरांना १०५ दिवस काम देणे बंधनकारक आहे. ‘मागेल त्याला पंधरा दिवसात रोजगार’ असे शासनाचे धोरण आहे. परंतु शासनाचा उद्देश यशस्वि होतांना दिसत नाही. बºयाचदा सर्व अलबेल असल्याची कागद मात्र रंगवली जातात.भिवंडी, ठाणे, कल्याण, पालघर, मुंब्रा, या ठिकाणी, गवत कापणे, बिल्डिंग बांधकाम, रेतीबंदर, आणि मिळेल ते काम करण्यासाठी जावे लागत असल्याचे रोहयो मजुरांनी सांगितले.तसेच दिवाळीचा सन अगदी पंधरा दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे दिवाळीच्या सणात आमच्या मुलाबाळांना आम्ही खायला काय देणार असा प्रश्न रोहयो मजुरांना पडला आहे.म्हणून दिवाळीच्या सणासाठी पैसे मिळावे म्हणून बाहेर शहरात जावे लागत आहे. आणि मिळेल ते काम करण्यास जावे लागत आहे. हे करीत असतांना बºयाचदा या आदिवासी मजुरांवर अन्याय होत असतो.जॉबकार्ड धारक रोहयो मजुरांना ग्रामपंचायत स्तर, पंचायत समतिी बांधकाम विभाग, तालुका कृषी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वनविभाग, पाणलोट क्षेत्र, वनीकरण, असा यंत्रणा महात्मा गांधी रोजगार हमी योजतुन रोजगार देनाºया यंत्रणा आहेत.मात्र एकाही मजुराला रोजगार हमीवर वर्षभरात १०५ दिवस काम मिळत नाही. त्यामुळे या भागातील आदिवासी रोहयो मजुरांचे स्थलांतर होतांना दिसत आहे.कायवरूपी रोजगार मिळत नसल्याने, अनेक समस्या या आदिवासी ग्रामीण भागात अनेक समस्या निर्माण होवून भूकबळी, कुपोषण, दारिद्र्य, गरिबी या समस्यां भेडसावत आहेत. मात्र, बेरोजगारीचे हे ओझे दरवर्षीचे असल्याने त्यांनाही त्याची सवय झाली आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार