शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्त व भूमीपुत्रांना नोकरी द्या; तारापूर अणुऊर्जा प्रकल्पावरुन शिवसेना आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2018 23:01 IST

एका महिन्यात प्रश्न सोडवा; अन्यथा संसदेत प्रश्न उपस्थित करणार-किर्तीकर, देसाई

बोईसर : तारापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणी करता ज्यांनी जमिनी व घरे दिलीत अशा प्रकल्पग्रस्त व भूमिपुत्रांना प्रकल्पांमधील नोकरीत सामावून घ्या अन्यथा याबाबतचा प्रश्न संसदेत उपस्थित करू असा इशारा खासदार गजानन किर्तीकर आणि अनिल देसाई यांनी शिवसेना व स्थानीय लोकाधिकार समितीने काढलेल्या धडक मोर्चात सोमवारी दिला.प्रलंबित मागण्या संदर्भात स्थानीय लोकाधिकार समितीने अनेक वेळा घेतलेल्या बैठकीत दिलेली अश्वासने पाळली न गेल्याने तसेच सकारात्मक व ठोस पाऊल उचलण्यात न आल्याने सोमवारी सकाळ पासून अणुऊर्जा केंद्राकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पाचमार्ग नाक्यावर प्रथम ठिय्या मांडून आंदोलन सुरु केले त्यानंतर शिवसेनेच्या व पदाधिकाºयांसह स्थानीय लोकाधिकार समितीने तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराच्या काही अंतरापर्यंत मोर्चा काढला.अनुकंपा तत्वावर भरती करण्याबाबत १७ हून अधिक प्रकरणे प्रलंबित असल्याचा आरोप खासदार अनिल देसाई यांनी केला. अनुकंपा तत्त्वावरील स्थानिकांना भरपाईची रक्कम देण्यात यावी, कंत्राटी कामगारांना किमान वेतन द्यावे या यासाठी हा लढा असल्याचे त्यांनी सांगितले. उपनेत्या विशाखा राऊत, आमदार विलास पोतनीस स्था लो. सचे उपाध्यक्ष बापू पाटील, जिल्हा प्रमुख राजेश शहा, व वसंत चव्हाण, माजी जिल्हा प्रमुख उदय पाटील, आमदार अमित घोडा, कोकण पाटबंधारे मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश धोडी, पालघर लोकसभा समन्वयक प्रभाकर राऊळ, पालघर विधान सभा संपर्क रमाकांत रात, उपजिल्हा प्रमुख राजेश कुटे, पालघर विधानसभा क्षेत्र प्रमुख वैभव संखे, महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख श्वेता देसले, पालघर विधानसभा महिला संघटक संगीता मोरे, तालुका प्रमुख विकास मोरे, पंचायत समिती सभापती मनीषा पिंपळे, उपसभापती मेघन पाटील, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुटे, तालुका प्रमुख सुधीर तामोरे, दीक्षा संखे, पंचायत समिती सदस्य, सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी महिला आघाडी, युवा अधिकारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .प्रशासनाशी केली चर्चाधडक मोर्चा नंतर खा कीर्तिकर व खा. देसाई आणि उपनेत्या विशाखा राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिष्ट मंडळ ने एनपीसीआयएलच्या स्थानिक व्यवस्थापनाशी अणु ऊर्जाकेंद्रात बैठक घेवून चर्चा केली त्या मधे सर्व मागण्या बाबत सकरात्मक निर्णय एका महिन्यात घेण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :agitationआंदोलनShiv Senaशिवसेना