शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गायमुख ते भाईंदर; २० हजार कोटींच्या प्रकल्पासाठी पाच कंपन्या मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2025 14:09 IST

एमएमआरडीए लवकरच करणार कंत्राटदाराची नेमणूक

मुंबई : मीरा-भाईंदर ते ठाणे प्रवास जलद करण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या गायमुख ते भाईंदर या २० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पाच्या कामासाठी पाच कंपन्यांनी १० निविदा दाखल केल्या आहेत. या प्रकल्पाच्या कामासाठी एमएमआरडीएने जुलैमध्ये काढलेल्या निविदेला कंपन्यांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे लवकरच कंत्राटदार अंतिम करून कामाला सुरुवात केली जाणार आहे. 

घोडबंदर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी गायमुख ते भाईंदर हा १५.५ किमीचा मार्ग उभारण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेतला आहे. त्यानुसार भाईंदर ते फाउंटन हॉटेल, असा १० किमी लांबीचा उन्नत मार्ग उभारला जाणार असून, हा मार्ग दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी ४ लेनचा असेल. त्यासाठी सुमारे ८५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तर फाउंटन हॉटेल ते गायमुख असा ५.५ किमीचा रस्ता उभारला जाणार आहे. त्यातील ३.५ किमीचा दुहेरी भुयारी मार्ग आहे. यात दोन्ही दिशांच्या वाहतुकीसाठी प्रत्येकी तीन मार्गिकांचे दोन स्वतंत्र बोगदे खोदले जातील. त्यापुढे सुमारे २ किमीचा उन्नत रस्ता असेल. त्यासाठी ११,५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. 

‘एमएमआरडीए’ने १० किमीच्या उन्नत मार्गासाठी आणि फाउंटन हॉटेल ते गायमुख या ५.५ किमीच्या भुयारी मार्गासाठी स्वतंत्र निविदा काढल्या होत्या. या दोन्ही प्रकल्पांसाठी प्रत्येकी पाच कंपन्यांनी निविदा भरल्या आहेत.  

भाईंदर ते फाउंटन हॉटेल १० किमी लांबीचा उन्नत मार्ग -  अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एल अँड टी, मेघा इंजिनिअरिंग, नवयुगा इंजिनिअरिंग, ऋत्विक प्रोजेक्ट फाउंटन हॉटेल ते गायमुख भुयारी आणि उन्नत मार्ग -  अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, एल अँड टी, मेघा इंजिनिअरिंग, नवयुगा इंजिनिअरिंग, ऋत्विक प्रोजेक्ट 

कसा होणार फायदा? मीरा-भाईंदर येथून ठाण्याकडे जाताना मोठ्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. गुजरात आणि उत्तर भारतातून येणारी अवजड वाहने या रस्त्यावर येत असल्याने कोंडीत भर पडते. त्यातून घोडबंदर फाउंटन ते घोडबंदर रस्त्यावर वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. त्यातून काही किलोमीटरच्या प्रवासासाठी वाहनांना तासन्  तास कोंडीत अडकून पडावे लागते. त्यामध्ये फाउंटन चौकात आणि गायमुख भागात मोठी कोंडी होते. हा भाग पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असल्याने तिथे रस्त्याचे रुंदीकरण करण्यात अडचण आहे. यावर तोडगा म्हणून गायमुख ते फाउंटन भुयारी मार्ग उभारला जाणार आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर