शहरं
Join us  
Trending Stories
1
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
2
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
3
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
4
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
5
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
6
तरुणींच्या ‘लाइव्ह’ हत्येनं अर्जेंटिना हादरला! 'मित्र'च बनले हैवान, तरुणींची बोटं कापली, नखं उपसली अन्... 
7
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
8
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
9
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
10
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
11
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
12
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
13
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
14
ठाणे जिल्ह्यात पुरामुळे  हजाराे नागरिकांचे ठिकठिकाणी स्थलांतर; शनिवार, रविवारी पावसाने  दिवसभर झोडपून काढले
15
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
16
स्वयंपाकघर ते मंत्रालय : ‘विदेशी’ असेल ते हाकला! बलाढ्यांशी टक्कर द्यायला स्वदेशी २.० आंदोलन
17
अतिवृष्टीमुळे शेतमाल सडला; तुटवड्यामुळे मिरचीचे दर दुप्पट
18
पाकिस्तानचे शेपूट किती वेळा नळीत घालून बघायचे?
19
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
20
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

गौरी गणपतीक चाकरमानी निघाली कोकणाक, पालघर आगारातून २३६ एसटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 03:39 IST

कोकणातील आपल्या घरी गौरी-गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी पालघर परिवहन विभागाच्या आगरातून एकूण २३६ बसेसची बुकिंग करण्यात आली असून ‘सर्वसामान्यांची जीवन वाहिनी’ समजली जाणा-या एसटीने प्रवाशांना सुखरूप कोकणात नेण्यास प्रारंभ केला आहे.

- हितेन नाईक ।पालघर : कोकणातील आपल्या घरी गौरी-गणपतीच्या उत्सवाला जाण्यासाठी पालघर परिवहन विभागाच्या आगरातून एकूण २३६ बसेसची बुकिंग करण्यात आली असून ‘सर्वसामान्यांची जीवन वाहिनी’ समजली जाणा-या एसटीने प्रवाशांना सुखरूप कोकणात नेण्यास प्रारंभ केला आहे.विशेष म्हणजे जादा वाहतुकीसाठी देण्यात येणारे चालक हे निर्व्यसनी व मद्यपान न करणारे असावेत या बाबत कटाक्ष पाळण्यात आला आहे. या बाबत कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व स्थानक प्रमुखांना जबाबदार धरण्यात येणार आहे. तसेच मद्यपान केलेल्या चालकास तात्काळ जागेवरच निलंबीत केले जाणार असून आगार व्यवस्थापकावरही कडक कारवाई करण्यात येणार आहे.२५ आॅगस्ट रोजी गणेश चतुर्थीला गणेशाचे आगमन घराघरात होणार असल्याने तसेच ३० आॅगस्ट ला गौरीपूजन, ३१आॅगस्टला गौरी-गणपती विसर्जन, ५ सप्टेंबर ला अनंत चतुर्दर्शीचा सणांचा कालावधी पाहता २२ आॅगस्ट पासून एसटी बसेस कोकणात जाण्यासाठी सुरु वात झाली आहे. तर परतीच्या प्रवासाची मुदत ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबर पर्यंत राहणार आहे. या दरम्यानच्या वाहतुकीसाठी पालघर परिवहन विभागांतर्गत वसई, अर्नाळा व नालासोपारा आगारातून एकूण २३६ बसेस बुकिंग झाल्या आहेत.त्या व्यतिरिक्त पालघर, बोईसर, डहाणू, जव्हार, वाडा या आगारातून नेहमीच्या रु टीन बसेसची व्यवस्था राहणार आहे. वसई तालुक्यातील तीन आगारातून मोठ्या प्रमाणात बसेस ची मागणी होत असल्याने औरंगाबाद विभागातून अतिरिक्त २५ बसेस नालासोपारा आगारात ठेवण्यात आल्या असून २२ आॅगस्ट रोजी त्या कोकणात रवाना होणार आहेत. त्यासाठी इतर विभागातून २५ चालक आणण्यात आले आहेत. त्यामुळे एकट्या नालासोपारा आगारातूनच १४५ बसेसची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.वसई तालुक्यात विरार फाटा ते घोडबंदर या दरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विभागीय वाहतूक अधिकाºयांनी दोन मार्ग तपासणी पथके व प्रशिक्षण बस गस्त पथक मुंबई-गुजरात महामार्गावर तैनात करावे असे आदेश पालघर विभागाचे नियंत्रक गायकवाड यांनी दिले आहेत. आगरातून पाठविण्यात येणाºया बसेसच्या इंधन टाक्या पूर्ण भरूनच देण्यात येणार असून अतिरिक्त इंधनाची सोय चिपळूण व महाड येथे करण्यात आली आहे.या आरक्षणात सुटे आरक्षण आणि संपूर्ण बसचे आरक्षण असे दोन प्रकार आहेत. विविध मंडळे ग्रामविकास मंडळे, गृहनिर्माण संस्था, संस्था यांनी संपूर्ण बसेसच आरक्षित केल्या आहेत. तर व्यक्तिगत स्वरुपातही आरक्षणाची वाढती मागणी लक्षात घेऊन जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत.अतिरिक्त बसेसही उपलब्ध करुन देणार२१ आॅगस्टला अर्नाळा आगरातून पहिली बस रवाना झाली असून २२ आॅगस्ट रोजी ४७ बसेस, २३ आॅगस्ट रोजी सर्वाधिक १३९ बसेस,२४ आॅगस्ट रोजी २९ बसेस तर २५ आॅगस्ट रोजी २० बसेस अशा एकूण २३६ बसेस बुक करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी मागणी केल्यास पालघर विभाग त्यासाठी सज्ज असल्याचे नियंत्रक अजित गायकवाड यांनी लोकमतला सांगितले.गाड्यांचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दिल्या असून सर्व व्यवस्थापकांनी संपर्कात राहून जादा गाड्या पाठविण्यावर भर देण्या संदर्भात निर्देश देण्यात आले आहेत. वरील नियोजन केलेल्या वाहनां व्यतिरिक्त अचानक गर्दी होऊन मागणी वाढल्यास वसई, अर्नाळा व नालासोपारा आगाराने स्वत:च्या ताफ्यातील बसेस वापराव्यात असे आदेश देण्यात आले आहेत.चोख व्यवस्था...ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग विभागाची पथके रामवाडी ते सावंतवाडी पर्यंत तैनात ठेवण्यात आलेली आहेत. महिला वाहकांना या ड्युटीतून वगळण्यात आले आहे. प्रवाशांचा उद्रेक टाळण्यासाठी त्याची माहिती तात्काळ सूचना फलकावर लावण्याचे सांगण्यात आले आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव