शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

आंबा फळ तयार होताना बागायतदारांनी काळजी घ्यावी; संरक्षण कसे करावे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 23:30 IST

आंब्यावर पडणाऱ्या किडीच्या बंदोबस्तासाठी एकरी; ४ या प्रमाणात फळमाशी सापळे बागेत लावावेत. या सापळ्यात फळमाशी आकर्षित होते व त्यात पडून मरते.

अनिरुद्ध पाटील कोकणात आंबा हे महत्त्वाचे पीक आहे. सध्याचे दिवस हे आंब्याला मोहोर येण्याचे आहेत. या दृष्टीने आंबा पीक संरक्षण कसे करावे, याबद्दल डहाणूतील कोसबाड कृषी विज्ञान केंद्रातील पीक संरक्षण शास्त्रज्ञ प्रा. उत्तम सहाणे यांच्याशी केलेली बातचीत...

प्रश्न : आंब्याला मोहोर आल्यानंतर कोणत्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो?आंब्याची झाडं मोहरल्यानंतर त्यावर तुडतुडे आणि भुरी या रोगासह फुलकिडे इत्यादीमुळे नुकसान होऊ शकते. तुडतुडे हे मोहोरातील रस शोषतात. त्यामुळे नवीन मोहोर सुकून किंवा गळून जातो. थंडीत मोहोरावर भुरी नावाच्या रोगामुळे राख आल्यासारखी लक्षणे दिसतात. हा रोग वाढून मोहोर काळा पडतो व गळतो.

प्रश्न : या दोन्ही कीड आणि रोगापासून मोहोराचे संरक्षण कसे करावे?पहिली फवारणी मोहोर येण्यापूर्वी पालवीवर डेल्टामेथ्रीन २.८ टक्के हे कीटकनाशक ९ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. दुसरी फवारणी बाँगे फुटण्याच्या वेळी लॅमडा सायलोथ्रिन ५ टक्के कीटकनाशक ६ मिली व सोबत हॅकझाकोनाझोल ५ टक्के हे बुरशीनाशक ५ मिली प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे. यानंतर १५ दिवसांनी तिसºया फवारणीकरिता बुफ्रॉफेझिन २५ टक्के हे कीटकनाशक १० मिली व सोबत भुरीच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारे ८० टक्के गंधक २० ग्रॅम प्रति १० लिटर पाण्यातून फवारावे.प्रश्न : हापूस आंब्यामध्ये चांगला मोहोर निघूनही फळे कमी लागण्याचे कारण काय?हापूस आंब्यामध्ये परागीभवन व फळधारणा वाढविण्याच्या दृष्टीने या बागेत केशर, रत्ना यासह अन्य जातींची १० ते १५ झाडे लावावीत. तसेच सर्व जातीच्या झाडांमुळे बागेत चांगले परागीभवन होण्यासाठी एक एकरात मधपेट्या ठेवाव्यात.पाऊस संपल्यानंतर मोहोर येईपर्यंत झाडांना पाणी देऊ नये. एकदा फळधारणा झाली म्हणजे दर १५ दिवसांनी बागेला पाणी द्यावे. एका झाडाला १५० ते २०० लिटर पाण्याची गरज असते.

 

टॅग्स :Mangoआंबा