शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

भावी महिला पोलिसांचे हाल, एका जागेसाठी ११० जणी स्पर्धेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 06:22 IST

महिला पोलीसभरतीला शनिवारपासून ठाण्यात सुरुवात झाली. शहर पोलीस दलात रिक्त असलेल्या अवघ्या ७२ जागांसाठी तब्बल ७,८७९ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या भरतीच्या पहिल्याच दिवशी तब्बल २,५०० उमेदवारांना पाचारण केले होते.

ठाणे - महिला पोलीसभरतीला शनिवारपासून ठाण्यात सुरुवात झाली. शहर पोलीस दलात रिक्त असलेल्या अवघ्या ७२ जागांसाठी तब्बल ७,८७९ उमेदवारांचे अर्ज आले आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या भरतीच्या पहिल्याच दिवशी तब्बल २,५०० उमेदवारांना पाचारण केले होते.महिलांची सुरक्षा डोळ्यांसमोर ठेवून तसेच त्यांना मुक्काम करण्यास लागू नये, म्हणून ज्या दिवशी बोलवले, त्याच दिवशी त्यांची संपूर्ण मैदानी चाचणी घेण्यात आली.परंतु, विविध जिल्ह्यांतून आलेल्या महिला उमेदवार मात्र या तळपत्या उन्हात सावली मिळेल, तेथे विसावा घेताना दिसत होत्या. कुणी तंबूत तर रस्त्याच्या कडेला तसेच फुटपाथसह मिळेल तेथे घाणीतही क्षणभर विश्रांती घेताना दिसत होत्या. प्रसाधनगृहांच्या अपूर्णतेमुळे त्यांचे हाल होत आहेत.ठाणे शहर पोलीस दलातील २३२ रिक्त जागांसाठी सुरू असलेल्या पोलीसभरतीत ३३ टक्के महिलांच्या आरक्षणाप्रमाणे शनिवारी ७२ जागांसाठी महिला उमेदवारांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. ती शनिवार, सोमवार आणि मंगळवार अशी तीन दिवस सुरू राहणार असून प्रत्येक दिवशी २५०० उमेदवारांना पाचारण केले आहे.तसेच येणाºया महिला उमेदवारांच्या मैदानी चाचणीत गोळाफेक, १०० मीटर धावणे, लांबउडी आणि ८०० मीटर धावणे असे प्रकार ज्या दिवशी बोलावण्यात आले, त्याच दिवशी त्यांच्याकडून पूर्ण करून घेण्यात येत आहेत. तर, ७२ जागांसाठी ७,८७९ उमेदवारांनी अर्ज केल्याने एका जागेसाठी जवळपास ११० उमेदवार जीवाची बाजी लावताना दिसत आहेत. यासाठी त्या तडपत्या उन्हाची ना असलेल्या दुरवस्थेची परवा न करताना दिसत आहेत. आहे, त्या परिस्थितीशी त्या दोन हात करून शारीरिक कवायती करताना दिसत आहेत.१० एप्रिलला लेखी परीक्षाभरती पूर्ण झाल्यावर किती उमेदवार पात्र झाले आहेत. यांची यादी येत्या ५ एप्रिलला जाहीर होणार आहे. तसेच १० एप्रिल रोजी लेखी परीक्षा साकेत पोलीस मैदानावर सकाळी होणार आहे. ती ८ एप्रिल होणार होती. पण, एमपीएससीही ८ एप्रिल रोजी असल्याने काही उमेदवारांनी परीक्षेची तारीख बदलावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार ती पुढे ढकलली आहे.अडचणी पाहून त्यांना पुन्हा संधीभरतीत उतरलेल्या उमेदवारांना एकावेळी आलेल्या दोन परीक्षा तसेच कौटुंबिक अडचणी किंवा अन्य काही कारणांमुळे बोलवलेल्या दिवशी येता आले नाही. तर, त्यांनी सांगितलेल्या कारणाची खातरजमा करून त्यांना पुन्हा संधी दिली आहे. साधारणत: २५-३० जणांबाबत असे घडले आहे.डमीप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखलभरतीत डमी उमेदवारप्रकरणी लहू राजू केसरकर, रमेश वाम आणि स्वप्नील सुरेश जगताप या तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी फसवणूक केल्याप्रकरणी हर्षल राजपूत यांनी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.उमेदवाराचे चित्रण करणे पडले महागात; गुन्हा दाखलभरती सुरूअसलेल्या साकेत पोलीस मैदानात कायदेशीररीत्या प्रवेशाशिवाय प्रवेश निषिद्ध आहे. तरीसुद्धा बुलडाण्याचा प्रकाश विश्वनाथ परिहार (२५) याने अनधिकृतपणे प्रवेश केला. तसेच फौजदारीपात्र अतिक्रमण करून चेस्ट नंबर २७२३१ असलेल्या उमेदवाराचे मैदाणी चाचणीचे छायाचित्रण करताना मिळून आला. याप्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात पोलीस नाईक रामदास बोरसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारPoliceपोलिस