शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण निधी सुरू करण्यासाठी साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2018 23:57 IST

प्रवीण दरेकर यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट; सहकार संघाचे दीड महिन्यापासून उपोषण

पालघर : राज्य सहकारी संघाचा शिक्षणनिधी पूर्ववत सुरू करण्याची मागणी आमदार प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शनिवारी भेट घेऊन केली. आपल्याला वेतन मिळावे आणि राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी पूर्वीप्रमाणे सुरू करावा, अशी मागणी करत राज्य सहकारी संघाचे कर्मचारी गेली दीड महिना सहकार आयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर उपोषण करीत आहेत.दोन दिवसांपूर्वी आमदार व राज्य संघाचे संचालक आमदार प्रवीण दरेकर यांनी उपोषणक करणाऱ्या कर्मचºयांची भेट घेतली. तसेच त्यांना लवकरात लवकर शिक्षण निधी पूर्वीप्रमाणे करण्यासाठी आपण मुख्यमंत्री व सहकार आयुक्तांची भेट घेऊन न्याय मिळवून देऊ, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्या नंतर, सहकार आयुक्त कार्यालयात झालेल्या शासकीय समिती सोबतच्या बैठकीत दरेकर यांनी आपली आग्रही भूमिका मांडली व शासनाला शिफारस करण्याचे या समितीत ठरले.दरेकर यांनी राज्य सहकारी संघाच्या कर्मचाºयांना वेतन न मिळाल्याने त्यांची उपासमार होत असल्याचे यांनी विधिमंडळाच्या लक्षात यापूर्वीही आणून दिले होते. तसेच, त्यांना शिक्षण निधी देण्याची मागणीही विधान परिषदेत केली होती. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून, या विषयावर उपाययोजना करण्यासाठी सहकार अतिरिक्त आयुक्त तोष्णीवाल यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली आहे. त्यांनी मुख्यमंत्र्याच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेऊन विषयची कल्पना दिली व त्यांच्या पगारकरीता तात्काळ निर्णय घेणे आवश्यक असल्याचे आग्रहाने सांगितले.मुख्यमंत्र्यांकडून सहकारमंत्र्यांना सूचना, कॅबिनेटमध्ये विषय घेणारमुख्यमंत्र्यांनी तात्काळ राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधून कॅबिनेट करीता राज्य सहकारी संघाचा शिक्षण निधी व वेतनाचा विषय घेण्याची सूचना दिली. त्यामुळे आता राज्य सहकारी संघाच्या कर्मचाºयांचा पगार व शिक्षण निधीचा विषय मार्गी लागण्याचे आशादायी चित्र निर्माण झाले आहे.मुख्यमंत्री या बाबत सकारात्मक असून ते व सहकार मंत्री राज्य संघाला न्याय देतील. तसेच सहकार चळवळीच्या शिक्षण प्रशिक्षण या विषयाला बळकटी मिळेल, असा विश्वास आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEducationशिक्षण