शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

नामांकित शाळांच्या विरोधात डहाणूत पालकांचा प्रकल्प कार्यालयावर मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2018 03:13 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू मार्फत जानेवारी महिन्यात पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणा-या श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीला आजारपणातून घरी आणल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता.

- शौकत शेखडहाणू : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू मार्फत जानेवारी महिन्यात पाचगणीतील ब्लुमिंगडे स्कूल अँड कॉलेज येथे सातवीत शिकणा-या श्रद्धा सुभाष गवळी या विद्यार्थिनीला आजारपणातून घरी आणल्यानंतर उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. तर गंजाड मणीपुर येथील राकेश रामा भावर या ९ वर्र्षांच्या आदिवासी विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यामुळे नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर पालकांनी निषेध मोर्चा काढुन निदर्शने केली.या शाळा व्यावस्थापन आणि शाळांवर कारवाई झाली पाहिजे या उद्देशाने शासनाला जाब विचारण्यासाठी हा निषेध मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी प्रकल्प अधिकाºयांना आदिवासी संघटनांच्यावतीने निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी कारवाईचे आश्वासन दिले.डहाणू, तलासरी, पालघर, वसई या तालुक्यातील गरजु व हुशार विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयाकडून दरवर्षी दर्जेदार इंग्रजी शिक्षणासाठी सातारा, महाबळेश्वर, पुणे, नाशिक, जुन्नर अशा वेगवेगळ्या ठिकाणी असणाºया नामांकित इंग्लिश मीडियम शाळेत पाठवले जाते.मात्र, चांगल्या शिक्षणासाठी पोटच्या गोळ्यांना पालक शेकडो किमी दुर पाठवत असलेतरी तेथे त्यांनी आदिवासी व मागासलेले असल्याने होणारी हेळसांड थांबलेली नसून भेटायला जाणाºया पालकांनाही तुसडेपणाने वागविले जाते अशा अनेक तक्रारी पुढे येत आहेत.परगावी शिकणाºया प्रत्येक विद्यार्थ्यावर शासन निवासी शिक्षणासाठी ९५ हजार रुपये खर्च करते. मात्र य नामांकित शाळा आणि आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार केले जातात. परिणामी या आदिवासी विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करुन त्यांची हेळसांड होत असल्याचा पालक असणाºया विलास सुमडा यांनी आरोप केला आहे. डहाणू केटी नगर येथून डहाणू प्रकल्प कार्यालयापर्यंत काढलेल्या निषेध मोर्चामध्ये पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यातील शेकडो पालकांनी एकत्र येऊन शासन व प्रशासनाचा निषेध केला.

टॅग्स :Schoolशाळा