शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

‘मैत्रेय’चे ठेवीदार धास्तावले

By admin | Updated: February 7, 2016 00:45 IST

गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून व गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही पैसे अदा न करणाऱ्या ‘मैत्रेय प्लॉट्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर

नाशिक : गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून व गुंतवणुकीची मुदत संपल्यानंतरही पैसे अदा न करणाऱ्या ‘मैत्रेय प्लॉट्स अ‍ॅण्ड स्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीच्या संचालिका वर्षा सत्पाळकर आणि जनार्दन अरविंद परुळेकर या संचालकांना गुरूवारी अटक झाल्यामुळे संपूर्ण मैत्रेय समूहाचे ठेवीदार धास्तावले असून कर्मचारी हवालदिल झाले आहेत. तर अन्य संचालकांच्या पाचावर धारण बसली आहे. या दोघांना सत्र न्यायाधीश एम़ एच़ मोरे यांनी शुक्रवारी (दि़ ५) तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली़ या निर्णयाविरोधात मैत्रेयच्या एजंटांनी न्यायालय आवारात तीव्र घोषणाबाजी करून ठिय्या आंदोलन केले होते. दरम्यान वृत्तपत्राच्या छायाचित्रकारांना धक्काबुक्की व मारहाण करणाऱ्या तिघा एजंटांना सरकारवाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे़मैत्रेय गु्रपममधील गुंतवणूकदार भारत शंकरराव जाधव (संभाजी चौक, जाधववाडी) यांनी कंपनीच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद केली आहे़ त्यानुसार मैत्रेयाच्या संचालक वर्षा मधुसूदन सत्पाळकर (४३, रा़ विरार, ठाणे) व जनार्दन अरविंद परुळेकर (रा़ पालघर) यांनी सप्टेंबर २०११ पासून गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या योजनांद्वारे जास्त रकमेचे व परताव्याचे आमिष दाखवून ३ लाख ५९ हजार ७४० रुपयांची गुंतवणूक करून घेतली़ तसेच मुदत संपल्यानंतरही गुंतवणुकीची रक्कम व त्यावरील व्याजाची रक्कम परत न करता तिचा अपहार केला असे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार ही कारवाई झाली.मैत्रेय समूहाच्या अनेक कंपन्या असून त्यांच्या महाराष्ट्रात १०७ शाखा आहेत. राज्यातील लाखो गुंतवणूकदारांनी कंपनीच्या विविध योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली आहे़ या कंपनीमध्ये गुंतविलेल्या रकमेची मुदत पूर्ण होऊनही तिचा परतावा मिळत नसल्याने गुंतवणूकदार हलवादिल झाले आहेत़ कंपनीने मुदत पूर्ण झालेल्या काही गुंतवणूकदारांना धनादेश दिले असून ते बँकेतून न वटता परत येत आहेत़ यामुळे संतप्त झालेल्या गुंतवणूकदारांनी होलाराम कॉलनीतील मैत्रेयच्या कार्यालयात मंगळवारी (दि़ २) गोंधळ घालून फलकाची तोडफोडही केली होती़सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा व सरकारवाडा पोलीस ठाण्यातील नऊ जणांच्या पथकाने संचालक वर्षा सत्पाळकर यांना गुरुवारी (दि़ ४) रात्री न्यायालयाच्या परवानगीने अटक केली़ तसेच, या एजंटांनी वृत्तसंकलनासाठी गेलेल्या वृत्तपत्राच्या छायाचित्रकारांनाही धक्काबुक्की करून मारहाण करण्याचा तसेच त्यांचा कॅमेरा फोडण्याचा प्रयत्न केला़ पोलीस उपआयुक्त एऩ अंबिका, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, डॉ़ सीताराम कोल्हे यांनी घटनास्थळी दाखल होऊन छायाचित्रकारांना मारहाण करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले़ या तिघांवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़तब्बल १० मिनिटे कामकाज ठप्पन्यायालयात वकिलांचा युक्तिवाद सुरू असताना बाहेर उभ्या असलेल्यांनी गोंधळ घातल्याने न्यायालयाने काम तब्बल दहा मिनिटे ठप्प झाले. न्यायालयात वकिलांव्यतिरिक्त कोणीही थांबू नका, असे आदेश दिल्यानंतर हा गोंधळ तुर्तास मिटला़