शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वसईतील एटीएम हॅक, आठ दिवसांत चार जणांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 05:49 IST

वसई शहरातील तामतलाव येथील काही एटीएम असुरक्षित असून अवघ्या आठ दिवसात चार जणांच्या खात्याची माहिती हॅक करून त्यांच्या खात्यातून लाखाहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे.

वसई : वसई शहरातील तामतलाव येथील काही एटीएम असुरक्षित असून अवघ्या आठ दिवसात चार जणांच्या खात्याची माहिती हॅक करून त्यांच्या खात्यातून लाखाहून अधिक रक्कम काढण्यात आली आहे.बँक आॅफ बडोदाच्या शाखेतील एटीएममधून २० जानेवारीला पैसे काढलेल्या तिघांच्या खात्यातून एटीएममधून २३ जानेवारीला पैसे काढण्यात आले आहेत. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर भाईंदर एटीएममधून पैसे काढणारा एक नायजेरीयन सीसीटीव्हीत दिसला आहे.मारिया डायस, हेलन आणि अशरफ शेख या तिघांच्या खात्यातून मंगळवारी पैसे काढले गेल्याचा मेसेज मोबाईलवर आल्यानंतर हा प्रकार उजेडात आला आहे. मारिया यांच्या खात्यातून १०हजार ५०० , हेलन यांच्या खात्यातून ३८ हजार आणि अशरफ यांच्या खात्यातून ३३ हजार काढण्यात आले आहेत.त्यांनी बँक आॅफ बडोदाच्या तामतलाव येथील एटीएममधून वेगवेगळ््या वेळी शनिवारी पैसे काढले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांच्या खात्यातून एटीएममधून पैसे काढले गेले. तसा मेसेज आल्यानंतर त्यांनी बँकेत विचारणा केली असता भाईंदर येथील एटीएममधून पैसे काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली. त्यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.वसईतील चंद्रशेखर खानिवडेकर यांच्याही खात्यातून १ लाख ४० हजार रुपये काढण्यात आले आहेत. २० जानेवारीला त्यांनी तामतलाव येथील बँक आॅफ इंडियाच्या एटीएममधून पैसे काढले होते. त्यानंतर त्यांच्या कार्डाची माहिती हॅक करून त्यांच्या खात्यातून १ लाख ४०हजार रुपये मीरा रोड आणि मुंबईतील विविध एटीएम मधून काढण्यात आले. त्यांनीही तक्रार केली आहे. ज्यावेळी एटीएममधून पैसे काढले त्यावेळी त्यांचा अकाउंट नंबर आणि पासवर्ड हॅक करण्यात आला असावा असा अंदाज आहे. पहिल्या तिघांच्या खात्यातून पैसे काढतांना भाईंदर येथील एटीएम सेंटरमध्ये एक नायजेरियन आढळून आला आहे. त्यामुळे यामागे नायजेरियन टोळी असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

टॅग्स :atmएटीएमCrimeगुन्हा