शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसही म्हणाले,"लाव रे तो व्हिडिओ"; ठाकरे बंधू एकमेकांबद्दल काय बोलले होते तेच ऐकवले...
2
BMC Elections 2026 : "काहींना निवडणुका आल्या की, मराठी माणूस दिसतो, इतरवेळी नेटफ्लिक्स..." एकनाथ शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
3
अर्ज मागे घेण्यासाठी कोट्यवधीची ऑफर, 'त्या' उमेदवारांना स्टेजवरच बोलावले; राज ठाकरेंचा घणाघात
4
केजी टू पीजी मोफत शिक्षण, मराठी आणि हिंदी भाषा सक्तीची असेल; नवी मुंबईत भाजपाचा जाहीरनामा
5
धक्कादायक! OTP किंवा लिंक नाही, आता तुमचा आवाज बँक खाते रिकामे करणार, बोलणे पडणार महागात
6
'आम्हाला युद्ध नको, पण...', ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे प्रत्युत्तर, खामेनेई आर-पारच्या मूडमध्ये
7
WPL 2026 : आरसीबीच्या ताफ्यातील ब्युटीनं एका ओव्हरमध्ये २ विकेट्स घेत मैफील लुटली, पण...
8
अजित पवारांना मोठा झटका! मतदानाच्या आधीच राष्ट्रवादीचा उमेदवारच भाजपात; BJP ला दिला पाठिंबा
9
KL Rahul Break Kohli Record: बिग सरप्राइज! KL राहुलनं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड! MS धोनी नंबर वन
10
बुलेट प्रेमींसाठी खुशखबर! रॉयल एनफिल्डनं Goan Classic 350 मध्ये केला जबरदस्त बदल
11
"तुझ्या वडिलांना तीन-तीन गोळ्या घ्याव्या लागतात, मी..."; गणेश नाईकांचा श्रीकांत शिंदेंवर घणाघात, एकनाथ शिंदेंनाही इशारा
12
अंबरनाथमध्ये शिंदेसेनेची खेळी, भाजपाला बसला झटका; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला लागली लॉटरी
13
WPL 2026 : मुंबई इंडियन्सचा सामना प्रेक्षकांविना खेळवण्याची वेळ; जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Pune Municipal Election: "...तर मला दिल्लीत जाऊन चर्चा करावी लागेल"; युती धर्माच्या विधानानंतर अजित पवारांचा इशारा
15
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
16
सायबर हल्ल्यापासून बचावासाठी वापरा USB कंडोम, कुठे अन् कसा वापर करायचा? जाणून घ्या...
17
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची अचानक तब्येत बिघडली; दिल्लीतील AIIMS मध्ये दाखल
18
Crime: सेक्ससाठी नकार देणाऱ्या पत्नीची गळा आवळून हत्या, पोस्टमॉर्टम रिपोर्टमुळं फुटलं पतीचं पितळ!
19
Video: 'माझा काय संबंध, मला...', मुस्तफिजूर रहमानबाबत प्रश्न विचारताच नबी पत्रकारावर चिडला
20
Shikhar Dhawan And Sophie Shine Engagement : "आम्ही आयुष्यभरासाठी..." शिखर-सोफीनं शेअर केली साखरपुड्याची गोष्ट
Daily Top 2Weekly Top 5

वणव्यांमुळे तुंगारेश्वर अभयारण्यातील वन्यजीवांना धाेका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 00:12 IST

वनविभागाकडून तपास सुरू

सुनील घरत

पारोळ : वन्यजीवांसाठी राखीव असणाऱ्या तुंगारेश्वर अभयारण्याला वणव्याचे ग्रहण लागले असून यात संचार करणाऱ्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. वणवे लागतात की लावले जातात, याचा शोध वनविभागाकडून सुरू आहे.मुंबईच्या ऑक्सिजनची कांडी व वसई तालुक्याचे महाबळेश्वर समजल्या जाणाऱ्या तुंगारेश्वर अभयारण्याला दोन-तीन दिवसांपासून पूर्वेकडील माजिवली, देपीवली, मस्किना बाजूने मोठा वणवा लागला, तसेच पश्चिमेकडे व उत्तरेकडेही अनेक छोटे-मोठे वणवे लागले. यामुळे अभयारण्यात दिवसा धुराचे लोट उठताना दिसत आहेत, तर रात्री मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून मांडवी गावाच्या समोरील बाजूने अगदी वर आगीच्या लालभडक ज्वाळा दिसत होत्या. सध्या लागत असलेल्या की लावल्या जाणाऱ्या या वणव्यांमुळे अभयारण्यातील प्राण्यांसह वनसंपदेला मोठी हानी पोहोचत असून फुलोऱ्यावर आलेल्या काळ्या मैनेला, दाट मोहोर धरलेल्या रायवळी आंब्यांना, हाटुरणे, शिवण, तोरण आदीसारख्या रानमेव्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे जंगली रानमेव्यावर रोजगार मिळवणाऱ्या रहिवाशांचा रोजगार बुडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वसई पूर्वेतील परिसर हा मोठ्या प्रमाणात जंगलपट्टा असलेला आहे. हा परिसर तुंगारेश्वर अभयारण्य व मांडवी वनक्षेत्र यांच्या अखत्यारीत येतो. या जंगलात अधूनमधून आगी लागण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे येथील वनक्षेत्र परिसर नष्ट होऊन वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. याआधीच लाकूडतोडी, अतिक्रमण यामुळे जंगलपट्ट्याचे प्रमाण कमी झाले आहे. वारंवार लागणाऱ्या आगीमुळे या भागातील जंगलपट्टा कमी होत आहे.

वणव्यांवर नियंत्रण आणण्यासाठी पथके तयार केली असून घनदाट जंगल असल्याने काही ठिकाणी आग विझवताना अडचणी येत आहेत. त्यासाठी आमच्या विभागाची आठ पथके वणवा विझवण्यासाठी काम करत आहेत.- राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्रपाल

वन्यप्राण्यांचा अधिवास धोक्यात असून वणवा रोखण्यासाठी वन्यजीव विभागाने योग्य ती खबरदारी घेत वणव्यांवर उपाययोजना करावी, तसेच वणवे लावणाऱ्यांवर कारवाई करावी.- लक्ष्मीप्रसाद पाटील, सचिव, महाराष्ट्र राज्य पर्यावरणमित्र बहुद्देशीय संस्था

टॅग्स :Vasai Virarवसई विरार