शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जाळ्यात सापडलेल्या शार्क माशाला मच्छिमारांनी दिले जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2018 18:24 IST

मासेमारी करताना जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क माशाला मच्छीमारांनी जीवदान दिल्याची घटना घडली आहे.

पालघर -  वडराई बंदरातून समुद्रात मासेमारीला गेलेल्या "अमर साई" ह्या बोटींच्या 'डोल जाळ्यात सापडलेल्या अवाढव्य शार्क व्हेल माश्याची सुखरूप सुटका करण्यात मच्छीमाराना यश मिळाले.आपले जाळे फाडून नुकसान सहन करीत मच्छीमारांनी त्याची सुटका करीत आपला जागतिक मच्छिमार दिन अनोख्या पद्धतीने साजरा केला.तालुक्यातील वडराई हे ताजे बोंबील माश्यासाठी प्रसिद्ध असून मंगळवारी हितेंद्र मेहेर हे सहकाऱ्यांना सोबत घेत बोट घेऊन पहाटे 4 वाजता मासेमारीला गेले होते.समुद्रात 12 नॉटिकल मैल क्षेत्रात त्यांनी आपल्या बोटीतील 'डोल जाळी कवी च्या खुंटाना रोवली.काही वेळा नंतर हे 'डोल जाळे खेचत असताना त्यांना सुमारे 25 ते 30 फुटांचा शार्क व्हेल मासा जाळ्यात अडकून सुटके साठी धडपडत असल्याचे पहावयास मिळाले. बोटीतील सर्व मच्छिमारांनी एकत्र येत त्याच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले.बोटीत असलेल्या घोश्या( काठीला बांधलेले टोकदार आयुध)च्या सहाय्याने त्याच्या शरीरा भोवती लपेटलेले जाळे त्याला कुठलीही इजा न करता सुखरूप पणे काढण्यात आले आणि तो पाण्यात दिसेनासा झाला.

शार्क ह्या अत्यंत खतरनाक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रजाती मधील हा शार्क व्हेल मासा आकाराने सर्वात मोठा असून शांत आणि प्रवाहातील पाणी पिऊन त्या द्वारे आलेले करंदी,मांदेली आदी लहान लहान मासे खाऊन जगतो.शार्क प्रमाणे तो अजिबात हल्ला करीत नाही.समुद्री पर्यावरण राखण्यात ह्या माश्याचा मोठा वाटा असून ह्या माश्याने आपल्या शरीरातून टाकलेल्या महाकाय विष्ठेच्या आसपास मोठ्या प्रमाणात प्लवंगाची निर्मिती होत असल्याचे झुलॉजीचे प्राध्यापक भूषण भोईर ह्यांनी लोकमतला सांगितले.ह्या प्लवंगा शेजारीच मासे आपली अंडी घालीत असल्याने माश्याच्या पिलांचे संवर्धन होत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 सातपाटी,डहाणू गावासमोरील समुद्रात मोठ्या प्रमाणात व्हेल,शार्क,डॉल्फिन, आदी माश्यांचे वास्तव्य असून वाढवणं बंदर,कॉरिडॉर मुळे ह्या माश्याचा अधिवासच नष्ट होणार आहे  - प्रा.भूषण भोईर

टॅग्स :fishermanमच्छीमारVasai Virarवसई विरारpalgharपालघर