शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

मच्छीमारांनी थेट समुद्रातच काढला मोर्चा, पाइपलाइनचे काम बंद पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 23:51 IST

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते.

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील रासायनिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची समुद्रामधील पाइपलाइन टाकण्याच्या कामावेळी खोदून काढलेले दगड तेथेच रचून ठेवले होते. या दगडांवर आदळून अपघातग्रस्त झालेल्या बोटींसह मच्छीमारांच्या झालेल्या नुकसानाचा मोबदला देण्यास चालढकल केली जात होती. त्यामुळे संतप्त झालेल्या मच्छीमार महिलांनी शुक्रवारी आपल्या कुटुंबियांसह थेट समुद्रात घुसून घटनास्थळी जाऊन काम बंद पाडले.देशामध्ये प्रदूषण करणाऱ्या औद्योगिक वसाहतीमध्ये तारापूर एक नंबरवर पोहोचली असून स्थानिक शेतकरी, मच्छीमारांची शेती, बागायती किनारपट्टीवरील खाडी - खाजणापर्यंत मर्यादित राहिलेले प्रदूषण आता थेट समुद्रात ७.१ किलोमीटर्सपर्यंत पोहोचणार आहे. तारापूरच्या रासायनिक सांडपाणी (सीईटीपी) प्रक्रिया केंद्रातून नवापूर गावामार्गे थेट समुद्रात जाणाºया पाईपलाईनमुळे आता सुमारे १ ते दीड हजार कारखान्यातील प्रदूषित रासायनिक पाण्यावर पुरेशी प्रक्रि या न करताच हे पाणी दूरवर फेकण्यात येणार आहे. त्यामुळे यावर स्थानिकांचे कुठलेही नियंत्रण राहणार नसल्याने समुद्राची परिस्थिती मुंबई-माहिमच्या मिठी नदी सारखी होणार असल्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करू लागले आहेत.दीड वर्षापूर्वी समुद्रात पाईपलाईन टाकण्याचा ठेका घेतलेल्या एसएमसी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड, ठाणे यांनी समुद्रात उत्खनन करताना फोडण्यात आलेल्या मोठमोठ्या खडकांचा ढीग समुद्रात रचून ठेवला होता. या पाण्याखाली असलेल्या ढिगावर कुठलेही मार्गदर्शक चिन्हे ठेकेदारांनी लावलेले नसल्याने नवापूर, उच्छेळी, दांडी गावातील अनेक बोटींना अपघात होऊन, त्यांच्या व्यवसायाचेही मोठे नुकसान झाले. त्यामुळे मच्छीमारांनी मोर्चा नेत काम बंद पाडून नुकसान भरपाईची मागणी केली होती. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने शुक्रवारी दुपारी तीनही गावातील ६० ते ७० मच्छीमार नौकांनी एमआयडीसी, एमपीसीबी यांच्या विरोधात घोषणा देत सनदशीर मार्गाने थेट समुद्र गाठला आणि पाइपलाइनचे काम बंद पाडले.आम्ही मत्स्य दुष्काळ, नैसर्गिक आपत्तीने संकटग्रस्त असताना आमच्या नुकसानीकडे हेतुपुरस्कर दुर्लक्ष केले जात आल्याने पहिले नुकसान भरपाईचे बोला नंतरच काम सुरू करा, असे बजावल्यानंतर ठेकेदाराला काम बंद करणे भाग पडले. यावेळी दांडी संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार तामोरे, जि.प.सदस्य तुळशीदास तामोरे, अभामा समितीचे कुंदन दवणे, विजय तामोरे, दशरथ तामोरे, राजेंद्र पागधरे, परेश पागधरे आदीसह महिला, मुले असे शेकडो ग्रामस्थांनी या मोर्चात सहभाग घेतला.समुद्रातील या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय मांगेला समाज परिषदेने हरित लवादात याचिका दाखल केल्यानंतर याचिकाकर्त्यांच्या वकील अ‍ॅड. गायत्री सिंग यांनी एमआयडीसीमधून सुरू असलेल्या प्रदूषणाची गंभीर स्थिती न्यायालयासमोर सादर केल्यानंतर न्यायालयाने कारवाईचा फास आवळला. तारापूरच्या २०० उद्योगाची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने तपासणी पूर्ण केली असून शर्ती-अटीचे उल्लंघन केलेल्या अनेक कंपन्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.मच्छीमारांनी दीड कोटी रुपयांची नुकसानभरपाईची मागणी केली असून आम्ही मत्स्य व्यवसाय विभागाकडून अहवाल मागितला आहे. तो अहवाल प्राप्त झाल्यानंतर वरिष्ठ पातळीवरून मंजुरी मिळाल्यावर त्याचे वितरण करण्यात येईल.- राजेंद्र तोतला, उपअभियंता, एमआयडीसी.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारfishermanमच्छीमार