शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

मच्छिमारीची मृत्यूघंटा वाजली; मासेमारी व्यवसाय येणार संपुष्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2018 23:45 IST

ठाणे जिल्ह्यातील किनारपट्टी लगतच्या सागरीक्षेत्रातील सुमारे ३५ मैलाचा (नॉटिकल) पट्टा मर्चंट शिपींग कॅरिडोर म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतल्याने मच्छीमार व्यवसायाची मृत्यूघंटा वाजली आहे.

- हितेन नाईकपालघर : ठाणे जिल्ह्यातील किनारपट्टी लगतच्या सागरीक्षेत्रातील सुमारे ३५ मैलाचा (नॉटिकल) पट्टा मर्चंट शिपींग कॅरिडोर म्हणून राखीव ठेवण्याचा निर्णय केंद्रसरकारने घेतल्याने मच्छीमार व्यवसायाची मृत्यूघंटा वाजली आहे. नेमक्या याच क्षेत्रात उत्तम आर्थिक उत्पन्न देणारे मासे मुबलक मिळत असतात. तेच सागरीक्षेत्र आता मासेमारीसाठी उपलब्ध होणार नाही. कारण ते मर्चंट शिपींगसाठी राखीव असणार आहेत. त्यामुळे मच्छिमारीचा व्यवसाय संपुष्टात येणार आहे. या व्यवसायातील करोडो मच्छिमार बांधव देशोधडीला लागणार आहेत. भाजप सरकारचा हा निर्णय संपूर्ण मासेमारी व्यवसायावरच नांगर फिरवणारा असल्याने १० कोटी मच्छीमारांवर हे संकट येणार आहे.केंद्र सरकारच्या मत्स्यव्यवसाय महासंचालकांकडून (डीजीएस) सागर माला प्रकल्पाच्या नावाखाली समुद्रात गुजरातमधील (कच्छ) खंबायतच्या आखातापासून ते तामिळनाडूच्या कन्याकुमारी दरम्यानच्या पश्चिम किनारपट्टीक्षेत्रात व्यापारी मालवाहतूक करण्यासाठी स्वतंत्र समुद्री मार्गाची आखणी करण्यासंदर्भात अधिसूचना जारी करण्याची प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. समुद्रात मच्छिमार नौका आणि व्यापारी जहाजे यांच्यात होणारे अपघात टाळण्यासाठी सुमारे ८५ हजार चौरस किलोमीटर्स क्षेत्र निषिद्ध, २० नॉटिकल मैल विस्तारलेला (३७.०४ किमी) तर किनाऱ्यापासून १५ नॉटिकल मैल (२७.७८ किमी) इतक्या समुद्री मार्गाची आखणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या मच्छिमार विरोधी निर्णयामुळे पश्चिम किनारपट्टीवरील जलवाहतूक पूर्णपणे विभक्त करण्याचा डाव भाजपच्या सरकारने आखला असून त्यामुळे हे क्षेत्र पारंपरिक मच्छीमारासाठी निषिद्ध म्हणून घोषित करण्यात येणार आहे. या मार्गातून महाकाय जहाजे, जलद वेगाने जाणाºया बोटीची मार्गक्रमणा होणार असल्याने चुकून एखादा मिच्छमार त्या मार्गिकेत शिरला आणि त्याच्या बोटीला अपघात झाल्यास, जीवितहानी अथवा त्यांच्या जाळ्याचे नुकसान झाल्यास कुठल्याही पद्धतीची नुकसान भरपाई दिली जाणार नाही. उलट त्या आखलेल्या मार्गक्र माणिकेत अनवधानाने प्रवेश केल्यास मच्छीमाराना फौजदारी कारवाईला आणि शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. संबंधित वृत्त/२मच्छिमारीतून होणार दहा कोटी तडीपारसागरीमाला प्रकल्पांतर्गत मर्चंट कॉरिडॉर उभारण्याचा घाट घातल्याने किनारपट्टीवर राहणाºया १० कोटी मच्छिमारांना त्यांच्या वंशपरंपरागत व्यवसायातून हद्दपार केले जाणार आहे. ४० नॉटिकल पुढे पापलेट, दाढा, घोळ, रावस, शिवंड आदी मासे जास्त प्रमाणात सापडत नसल्याने मासेमारी व्यवसायच बंद पडण्याची शक्यता आहे.जिल्ह्यातील पालघर, डहाणू आणि वसई तालुक्यात सुमारे १ लाख मच्छिमार कुटुंबीय असून ८२ गावातून मासेमारी केली जाते. १० ते १२ लाख मच्छीमारांची संख्या असून आॅनलाइन प्रणालीद्वारे ३ हजार ७० बोटी आहेत. २०१६-१७ या वर्षात ६३ हजार ७१३ मेट्रिक टनांचे १८१ कोटी ५५ लाखांचे मत्स्योत्पादन होत असल्याची माहिती सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त दिनेश पाटील यांनी लोकमतला दिली.मर्चंट शिपिंग कॉरिडोरमुळे किनारपट्टीवरील मच्छिमार देशोधडीला लागणार आहेत. आम्हाला उध्वस्त करायला निघालेल्या वाढवणं, जेएसडब्लू, आदी विनाशकारी प्रकल्प रद्द करावेत या मागणीसाठी ३० आॅक्टोबर रोजी किनारपट्टीवरील सर्व मच्छीमारांनी बंद पुकारण्याचा निर्णय गोवा येथे झालेल्या एनएफएफ च्या बैठकीत घेण्यात आला आहे.- नरेंद्र पाटील, अध्यक्ष, एनएफएफ.वडराई येथे ५५ मच्छिमार बोटी असून सुमारे २ हजार माच्छमार या व्यवसायावर अवलंबून आहेत.अश्या अनेक गावातील व्यवसाय कॉरिडॉर मुळे संपुष्टात येणार असल्याने ३० आॅक्टोबरचे बंद आंदोलन एकजुटीने संपूर्ण ताकदीने उभारू.- मानेंद्र आरेकर, चेअरमन, वडराई मच्छिमार सहकारी संस्था

टॅग्स :Vasai Virarवसई विरार