शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच पावसात महावितरणची झाली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 23:42 IST

झाडे व फांद्यामुळे वीज पुरवठा खंडित; उष्म्यामुळे नागरिक त्रस्त, बॅँक व ऑनलाईन व्यवहार ठप्प

विरार : मान्सून पूर्व तयारी म्हणून महावितरणतर्फे वृक्ष छाटणी करण्यात आली होती. परंतु पहिल्याच पावसाच्या सरित मोठ-मोठी झाडं खांबावर व विद्युत तारांवर पडल्याने तालुक्यातील अनेक भागात विजेचा लंपडाव सुरु झाला आहे.पावसाळा पूर्वकाळामध्ये महावितरणतर्फे सर्व कामे पूर्ण करून घेण्यात आली होती. फक्त पाणी लागल्यानेच नाही तर झाडांच्या फांद्या पडल्याने देखील विद्युत यंत्रणा खंडीत होऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन महावितरणने उंच व विजेच्या तारांना लागणारी झाडांची छाटणी केली. तसेच ज्या झाडांमुळे वादळ वारा आल्यावर जीवितहानी किंवा कोणतेही नुकसान होऊ शकते अशा झाडांची देखील छाटणी केली. परंतु, महावितरणची वृक्ष छाटणी प्रक्रिया पहिल्याच पावसात फसली आहे.वसई विरार शहरात पावसासोबतच वादळी वाऱ्यांनीदेखील हजेरी लावली तर यावेळी मोठ मोठी झाडं विजेच्या तारांवर व विद्युत यंत्रणांवर पडली. सोमवारी १२ तास, मंगळवारी १५ तास तर त्यानंतर सतत वीज पुरवठा खंडित होत होता. वृक्षांची छाटणी करून देखील झाडांमुळे विद्युत यंत्रणा बांधित झाली. विरार पूर्वेला अनेक ठिकाणी फांद्या, ट्रान्सफॉर्मर पडले व वीज पुरवठा खंडित झाला. नागरिकांना या पावसाळ्यात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी महावितरण विभागाने संपूर्ण तयारी केली होती. मात्र, महावितरणच्या तयारीला यश आलेले नाही.‘‘आमच्या परिसरात झाड पडलं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रशासनाकडून मदत न मिळाल्यामुळे आम्हीच ते झाड उचलून बाजूला केले असे भारती जोग यांचे म्हणणे आहे. अर्नाळा, विराट नगर, मानवेल पाडा, यशवंत नगर, जकात नका इत्यादी ठिकाणी झाडं पडून मोठे नुकसान झाले आहे. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांना उष्म्याचा सामना करावा लागला आहे. अनेक ठिकाणी सोसायटीमध्ये देखील झाडं पडली होती.महावितरणच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना उष्म्यामध्ये दिवस काढावे लागत आहेत. मात्र, पडलेली झाडे उचलून वीज पुरवठा पुर्ववत सुरु करण्याचे काम देखील महावितरण लवकर करत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.सोमवार, मंगळवारी झाडांमुळे इतके नुकसान झाल्याने व वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांनी वृक्ष छाटणीसाठी महापालिकेला पाचारण केले. महावितरण विभागाने व्यवस्थित तपासणी न करता वृक्ष छाटणीचे काम केले असल्याने पावसाळ्याच्या सुरुवातीलाच वीज यंत्रणा बाधित झाल्याची टिका होत आहे.वादळ वारा होता त्यामुळे झाडं पडली. महावितरणा विभागाला जी झाडं धोकादायक वाटली त्यांची छाटणी करण्यात आली आहे. नागरिकांना पुन्हा त्रास होणार नाही यासाठी महावितरणचे प्रयत्न सुरु आहेत.’’- ए. एस. मिर्झा, महावितरण विभाग अधिकारी

टॅग्स :mahavitaranमहावितरण