शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

अखेर पोलिसांनी बुजविले महामार्गावरील खड्डे; वाहतूककोंडी होत असल्याने उचलले पाऊल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 23:59 IST

मुंबई, ठाणे व इतर उपनगरांत जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा

नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील नायगाव येथील मालजीपाडा गावाच्या हद्दीत पूल बनविण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे याच रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने वाहतुकीच्या खोळंब्याची मोठी समस्या निर्माण झाली होती.महामार्गावर सोमवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास याच ठिकाणी प्रचंड वाहतूककोंडी झाली होती. मुंबई, ठाणे व इतर उपनगरात जाणाºया प्रवाशांचा खोळंबा झाला होता. अंदाजे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूककोंडीची माहिती मिळाल्यानंतर महामार्गावरील पोलीस पोहचले. खड्ड्यांमुळे होत असलेल्या वाहतूककोंडीकडे कोणीही लक्ष देत नसल्याने दररोज प्रवाशांना त्रास होत असल्याने हे खड्डे बुजविण्यासाठी पोलिसांनी पाऊल उचलले. त्यांनी आजूबाजूला असलेली माती आणि दगड टाकून खड्डे बुजविण्यास सुरुवात केली. यानंतर काही वेळाने वाहतूक सुरळीतपणे झाली. कोरोनाच्या काळात पोलिसांनी खड्डे बुजविण्याचे काम केल्याने वाहन चालकांनी त्यांची स्तुती केली.तीन दिवसांपूर्वी जोरदार पाऊस पडल्याने निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे सोमवारी मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांनी स्वत: खड्ड्यांमध्ये माती व दगड टाकून ते बुजविल्यावर वाहतूककोंडी हटविण्यात यश आले. पावसाळ्यापूर्वी खड्ड्यांबाबत पत्रव्यवहारही केला होता.- नरेंद्र वडे, पोलीस उपनिरीक्षक, चिंचोटी पोलीस चौकी, महामार्ग पोलीस.

टॅग्स :PoliceपोलिसPotholeखड्डे