शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर वसई विरार शहर महानगरपालिकेवर प्रशासकाची नेमणूक !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 16:36 IST

28 जून 2020 मध्यरात्री पासून प्रशासकाच्या भूमिकेत...

आशिष राणे, वसई

मुंबई - कोरोना विषाणूच्या जीवघेण्या संकटामुळे राज्यातील तीन महानगरपालिकांच्या निवडणूका यापूर्वीच पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तर या तिन्ही महापालिकांच्या मुदती संपुष्टात आल्याने यापूर्वीच राज्य निवडणूक आयोगाने राज्य शासनाला या महापालिकावर प्रशासक नियुक्तीची शिफारस करण्यासंदर्भात पत्र दिले होते. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी वसई विरार शहर महानगरपालिका प्रशासनावर राज्याच्या नगरविकास खात्याने प्रशासक नेमण्याची राज्य निवडणूक आयोगाची शिफारस मान्य करीत तसे प्रशासक नियुक्तीचे आदेशच सरकारने जारी केले आहेत. दरम्यान वसई -विरार शहर महापालिकेचे प्रशासक म्हणून वीस दिवसांपूर्वी नव्याने धुळे येथून नियुक्त झालेले मनपा आयुक्त गंगाथरन देवराजन हेच या महापालिकेचे काम पाहणार आहेत हे विशेष .

वसई विरार शहर महानगरपालिकेची मुदत 28 जून 2020 रोजी संपुष्टात येत आहे.तर कोरोना मुळे याआधीच सरकारने या निवडणूका पुढे ढकलल्या आहेत. असे असताना देखील व दि.28 जून पुर्वी नव्याने महापालिका अस्तित्वात येणे कायद्याने बंधनकारक होते पण ते आता शक्य नाही. त्यामुळे आता महानगर पालिकेवर प्रशासक नेमण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एकूणच मागील तीन महिन्यांपासून महापालिका प्रशासनाचा कारभार हा पालघर जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे हे पाहत होते, तर नवीन आयुक्त तथा वसई विरार महापालिकेला आय ए एस दर्जा प्राप्त आयुक्त मिळणार का यासाठी वसईतील विरोधक व राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार हे आग्रही होते, त्यानुसार वीस दिवसांपूर्वीच धुळे जिल्हाधिकारी म्हणून राहीलेले आय ए एस गंगाथरन देवराजन यांची वसई विरार मनपा पदी नियुक्ती झाली आणि त्यांनी पदभार ही स्वीकारून दणकेबाज कामास सुरुवात ही केली आहे. त्यामुळे राज्यातील शिवसेना व वसई -विरारकरांच्या मनात महानगरपालिकेवर प्रशासक नियुक्त करावा, असं मनोमनी होतंच. पण तशी परिस्थिती निर्माण होत नव्हती. अखेर कोरोना विषाणूमुळे आता ते शक्य झालं आहे. कारण संपूर्ण पणे कोरोनामुक्त महाराष्ट्र होत नाही, तोपर्यंत कोणतीही निवडणूक राज्यात होणार नाही. त्यामुळे येणाऱ्या जून किंवा त्याही पुढे जाऊन ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत या निवडणूका पुढे जाऊ शकतात.

अर्थातच कोरोनाच्या संकटात या निवडणुका लवकर होणं शक्य नाही. त्यामुळे या तीनही महापालिकांवर प्रशासक नियुक्त करावा, असं पत्र राज्य निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिलं होतं. यदाकदाचित कोरोनाच्या संकटात या महापालिकांना मुदतवाढ मिळेल अशी चर्चा होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाने निवडणूक आयोगाने या महापालिकांना मुदतवाढ न देता त्यांच्यावर प्रशासक नियुक्त करण्याच्या सूचना देखील राज्य सरकारला केल्या होत्या

वसई विरार शहर महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती ! नवनियुक्त आयुक्तच गंगाथरन देवराजन झाले प्रशासक !

लॉकडाऊनमुळे महापालिकेची निवडणूक स्थगित केल्याने अखेर मंगळवारी सायंकाळी राज्य सरकारचा निर्णय झाला.यात दि.28 जून 2020 च्या मध्यरात्रीपासून वसई विरार शहर महापालिकेचा कारभार प्रशासक म्हणून सांभाळणार असून वीस दिवसांपूर्वी पदभार स्वीकारलेले गंगाथरन देवराजन यांची च प्रशासकपदी नियुक्त केल्याचे सरकारच्या नगरविकास विभागाने परिपत्रकाद्वारे त्या त्या महापालिकेला तसे  आदेश कळविले आहे. तर आयुक्त व प्रशासक अशा दुहेरी भूमिकेत सध्याचे आयुक्त पालिका प्रशासनाचा कारभार हाताळणार आहेत. 

टॅग्स :Vasai Virarवसई विरारMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूक