शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा तराप्यावरून जीवघेणा प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 04:21 IST

शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत.

- वसंत भोईरवाडा : शहरालगतच्या वैतरणा नदीवर सिद्धेश्वरी येथे पूल नसल्याने थरारक व जीवघेणा प्रवास करु न शाळा गाठण्याची कसरत वाडा तालुक्यातील विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील विद्यार्थी गेली अनेक वर्ष करत आहेत. वारंवार पुलाची मागणी करूनही शासनाकडून होत असलेले हे दुर्लक्ष विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याचा धोका संभवत आहेयेथील एनशेत गावाजवळून वाहणाऱ्या वैतरणा नदीच्या पलीकडे असलेल्या विलकोस या गावातील ग्रामस्थ नदीवर पुल व्हावा यासाठी २५ वर्षे संघर्ष करीत आहेत. उन्हाळयÞात ग्रामस्थ व विद्यार्थी नदीला पाणी कमी असल्याने नदीपलीकडे जावू शकतात. या ग्रामस्थांना वाडा शहराची बाजारपेठ जवळ पडत असल्याने दैनंदिन कामकाज व व्यवहारासाठी जाणे-येणे नियमतिपणे या नदीपात्रातून सुरु असते.पावसाळयÞात मात्र या नदीच्या पात्रातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होत असल्याने नदीपलीकडे जाणे शक्य होत नाही. त्यांना १५ ते २० किलोमीटर अतंर वळसा घालून वाडा येथे जावे लागते. या नदीवर पूल नसल्याचा सर्वात मोठा फटका विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. विलकोस गावातील आणि आजुबाजूच्या पाड्यांमधील सुमारे ३० ते ४० विद्यार्थी दररोज वाडा शहरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येत असतात. मात्र नदी पार करण्यासाठी पूल नसल्याने बांबू अथवा प्लास्टिक पाईप एकित्रत बांधून तयार केलेल्या तराप्यावरु न जीवघेणा प्रवास करण्याची वेळ त्यांच्यावर दर वर्षी येते. मात्र नदीची पातळी खोल असल्याने हा प्रवास कधीही जीवावर बेतणारा ठरू शकतो, याची कल्पना असताना शिक्षणाच्या ओढीने हे विद्यार्थी हा संघर्ष करीत आहेत. वैतरणा नादीवरील हा पूल झाला तर तालुक्याच्या पूर्वेकडील अनेक गावे तालुक्याशी जोडली जातील.निर्णय प्रक्रियेच्या लालफितीत अडकलाय पूलवैतरणा नदीवर ऐनशेत येथे पूल होणे ही मागणी वर्षानुवर्षाची आहे. परंतु अद्याप पूलाला चालना मिळाली नाही. तराप्याचा आधार घेवून विद्यार्थी तसेच ग्रामस्थ जीवघेणा प्रवास करत आहेत. या पूलाच्या बांधकामासाठी सुमारे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाली असल्याचे सा.बां. विभागाने दिली असून प्रशासकीय मंजुरीकरिता प्रस्तावित असल्याचे कनिष्ठ अभियंता प्रकाश पातकर यांनी सांगितले.परंतु प्रशासकीय मंजुरी, तांत्रिक मंजुरी त्यानंतर निविदा प्रक्रि या यासाठी आणखी किती कालावधी जाईल हे निश्चित नसल्याने व प्रशासकीय कामकाजात होणारी दिरंगाई पाहता एकविसाव्या शतकातही आणखी किती वर्ष हा जीवधेणा संघर्ष ह्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतोय हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार