शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-बडोदा महामार्गाचे काम बंद पाडण्याचा शेतकऱ्यांचा इशारा; शेतात पाणी साचले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2023 07:28 IST

‘लोकमत’मधील वृत्तानंतर कंपनीकडून पाहणी

सफाळे : पालघर तालुक्यातील सफाळे पूर्व भागातील मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या कामामुळे नैसर्गिक नाले बंद झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पेरलेले भात बियाणे कुजण्याची भीती असून दुबार पेरणी करण्याचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. ‘लोकमत’मध्ये यासंदर्भातील बातमी प्रकाशित होताच शनिवारी एक्स्प्रेस वेचे काम करीत असलेल्या जीआर इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर यांनी शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. दोन दिवसांत शेतातील पाण्याचा निचरा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मात्र, गिराळे- नगावे गावातील शेतकरी  आक्रमक झाले असून काम बंद करण्याचा इशारा दिला आहे. 

पालघर तालुक्यातील १८० हेक्टर जमीन ही मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या कामासाठी संपादित केली असून १५ ते २० फूट उंच भराव टाकण्यात आला आहे. मात्र, या एक्स्प्रेस वेच्या दोन्ही बाजूंनी  शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात शेती आहे. या कंपनीमार्फत नैसर्गिक नाले बंद करून  पाणी जाणाऱ्या मार्गात  बदल केला आहे. त्यामुळे चार-पाच दिवसांपासून पाणी शेतातच साचले आहे. मुंबई- बडोदा एक्स्प्रेस वेच्या जीआर इन्फ्रा कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर अरविंद श्रीवास्तव, डेप्युटी प्रोजेक्ट मॅनेजर ललित जोशी, प्रवीण भिंगारे यांनी शनिवारी गिराळे येथे जाऊन शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली.

न्याय मिळाला नाही, तर आंदोलन नैसर्गिक नाले बंद केल्यामुळे  शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. न्याय मिळाला नाही तर आंदोलनाचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला. यावेळी पंचायत समितीच्या सदस्य कामिनी पाटील व तुषार पाटील, गिराळे- नगावे येथील  सरपंच मयुरी पारधी, उपसरपंच कल्याणी पाटील, सदस्य अमोल पाटील, पोलिस, केतन पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

टॅग्स :palgharपालघरFarmerशेतकरी