शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

सूर्याच्या पाण्यापासून विक्रमगडचे शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:55 IST

धरण उशाला; तरी कोरड घशाला

विक्रमगड : तालुक्यात १९७८ साली धामणी-कवडास या ठिकाणी सूर्या धरणाचे काम सुरु करण्यांत आले होते़ हे धरण विक्रमगड तालुक्यात येत असून या धरणांत लाखो गॅलन पाण्याचा मोठा साठा आहे़ परंतु गेल्या २० ते २५ वर्षात या धरणातील पाण्याच्यासाठयापैकी १ लिटर पाणी देखील स्थानिक लहान मोठया शेतकरी वर्गास गाव-पाडयांतील रहिवाशांच्या गावात पुरविण्यांत आले नसल्याचा आरोप येथील जनता करीत आहे़ या धरणाच्या पाण्यापासून विक्रमगड तालुका वंचित राहीलेला आहे.एकीकडे पाणी टंचाई व पाण्याचा साठा असूनही पाण्यापासुन वंचित राहावे लागत आहे अशी खंत येथील शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.विक्रमगड तालुक्यांतील बहुसंख्य शेतक-यांना हया धरणाचे पाणी देण्यासाठी साधा विचार देखील झाल्याचे दिसून येत नाही़ विक्रमगड तालुक्यातील तलवाडा मार्गे हे पाणी विक्रमगड तालुक्यात फिरविले तर हजारो हेक्टर जमीन ओलीताखाली येऊन शेतकरीवर्गाचा मोठा फायदा होईल़ व नगदी पिके घेता येऊन त्यांची आर्थिक उन्नती होईल़ या भागातील शेतकरी फुलबाग (मोगरा, झेंडु आदी़), भाजीपाला (गवार वगैरे) कडधान्यांमध्ये (काळा हरभरा), बागायतीमध्ये (आंबा, चिकू) यांसारख्या नगदी पिकांचे उत्पादन घेत आहे ज़र या धरणाचे पाणी या तालुक्यांस दिले गेले तर येथील शेतकरी द्राक्षे, ऊस अशा बारमाही पिकांचे उत्पादन वाढवू शकतील़व निश्चितपणे पश्चिम महाराष्टÑाप्रमाणे पिके घेऊ शकल्यास त्यांना दुधाचा व पोल्ट्रीचा व्यवसाय करता येईल.तालुक्याची उन्नती होईलस्थंलातरीत जो मजुर आहे त्यांस देखील जागेवर काम मिळेल व त्यांची परवड थांबेल त्यामुळे संबंधीत विभाग व शासनाने यांचा सखोल गांभीर्यपूर्वक विचार करणे गरजेचे आहे़ विक्रमगड तालुक्यांत धरण आहे परंतु त्यांचा लाभ शेजारील ५ तालुक्यांस होतो व तेथील शेतकरी वर्ग नगदी पिके घेवुन आपली प्रगती करीत आहेत.

टॅग्स :Damधरण