वाड्यात शेतकऱ्यांची मासेमारीची लगबग; रोजगारही होतो उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 11:44 PM2019-09-10T23:44:16+5:302019-09-10T23:44:34+5:30

शेतीची कामे कमी असल्याने मासेमारीला वाव

Farmers fishing in the castle; Jobs are also available | वाड्यात शेतकऱ्यांची मासेमारीची लगबग; रोजगारही होतो उपलब्ध

वाड्यात शेतकऱ्यांची मासेमारीची लगबग; रोजगारही होतो उपलब्ध

Next

वाडा : तालुक्यात सतत मुसळधार पाऊस कोसळत असल्याने त्याचा फायदा काही शेतकऱ्यांनी शेतातील मासे पकडण्यासाठी घेतला असल्याचे चित्र खेडोपाडी पहायला मिळते आहे. भात शेतीच्या फर्चीला (पºया) लाकडाच्या अथवा लोखंडाच्या सळयांचा पिंजरा (किव ) करून त्याला तंगुसाचे विणलेले जाळे लावून मासे पकडले जातात.

शेतातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने या प्रवाहात वाहणारे मासे जाळ्यात अडकून पकडण्याची सध्या शेतकºयाची लगबग सुरू आहे. या महिन्यात भात शेतीची कामे कमी असल्याने शेतकºयांना फुरसत असते. त्यामुळे शेतकरी मासे पकडण्याचा व्यवसाय करतो त्यातून त्याच्या हाताला काम आणि खर्चायला चार पैसै मिळत असल्याने संसार चालवायला हातभार लागतो.

वाड्यात बारमाही वाहणाºया पाच नद्या, तलाव, नाले असल्याने येथे माशांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शेतकºयांच्या शेतामध्ये मासे मोठ्या प्रमाणात येतात आणि त्यांच्या विक्रीतून रोजगार निर्मिती होते. गावठी माशांना बाजारपेठेत मोठी मागणी असून भावही चांगला मिळतो. आता श्रावण महिना संपल्याने सध्या खवय्यांनी आपला मोर्चा गावठी माशांकडे वळवल्याने या माशांना वाढती मागणी आहे.
पिके येथील दामोदर पाटील या शेतकºयाने पाच वर्षांपूर्वी सुमारे ३५ हजार रुपये खर्च करून त्यांच्या शेताला (किव) बांधून लोखंडी किव केला आहे. यावर ते दरवर्षी दीड ते दोन टन मासे पकडतात. सुमारे एक ते दीड लाख रुपयांच्या माशांची ते विक्री करतात.

रात्रीच्या वेळी मासे खूप मिळतात. मात्र रात्रीच्या वेळी पाण्याच्या प्रवाहात येणाºया सापांपासून खूप भीती असते. भर पावसात मासे पकडण्यास त्रास होत असला तरी तो आनंद वेगळाच असतो. - काळूराम पाटील, शेतकरी, चिंचघरपाडा

Web Title: Farmers fishing in the castle; Jobs are also available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.