शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

'शेतकरी कायदा रद्द होणार नाही, आंदोलनकर्ते राजकीय पक्षांचे'; रामदास आठवलेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 16:53 IST

शेतकरी आंदोलनाच्या पार्शवभूमीवर आठवले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

- नितिन पंडीत 

भिवंडी: दिल्लीत सुरु असलेले शेतकरी अंदोलन हे शेतकऱ्यांचे आंदोलन नसून ते राजकीय पक्षांचे व राजकीय संघटनांचे आंदोलन आहे. त्यामुळे या आंदोलनात देशभरातील शेतकरी सामील नसून केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी पारित केलेला शेतकरी कायदा रद्द होणार नाही. असे वक्त्याव केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुधवारी भिवंडी एका खासगी कंपनीच्या कार्यालय उदघाटनाप्रसंगी केले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्शवभूमीवर आठवले यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे शेतकऱ्यांसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे भिवंडी तालुक्यातील गुंदवली गावात असलेल्या गोदाम संकुलनात उभारलेल्या मास्टर मॉडलिंग या कंपनीच्या उदघाटन सोहळ्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना शेतकरी आंदोलनावर वरील वक्तव्य केले.

मोदी सरकारने नव्याने कृषी कायदा लागू केला. मात्र या कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला लागतील आणि भांडवलदार मलाई खातील असा देशभरातील शेतकऱ्यांनी एल्ल्गार पुकारत गेल्या १५ दिवसापासून दिल्लीत कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी अंदोलन सुरु केले आहे. मात्र भाजप नेत्यांसह त्यांचे मित्र पक्षातील नेत्यांनीही कृषी कायदा रद्द होणार नाही. असे वारंवार विधान करीत आहेत. त्यामुळे हा वाद आणखीच चिघळला आहे. त्यातच केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही भाजप नेत्याप्रमाणे कृषी कायदा रद्द होणार नाही. मात्र त्यामध्ये सुधारणा होऊ शकते. असे सांगत केंद्र सरकाराने लागू केलेल्या कृषी कायदाची पाठराखण केली. 

केंद्रातील मोदी सरकारने कृषी कायदा शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी लागू केला. मात्र मोदी सरकारच्या विरोधात असलेल्या सर्वच राजकीय पक्ष शेतकरी आंदोलनाच्या आड मोदी सरकारला बदनाम करण्याचा डाव रचत असल्याचेही रामदास आठवले यांनी आरोप करीत विरोधकांवर निशाणा साधला. तर लवकरच कृषी कायदावर केंद्र सरकार तोडगा काढून शेतकऱ्यांचे अंदोलन थांबविण्यात यशस्वी होतील असा अशावाद शेवटी आठवले यांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीRamdas Athawaleरामदास आठवलेFarmer strikeशेतकरी संपMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार