शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुक फ्रेंड हत्या प्रकरण, सेक्सनंतर रक्तस्त्रावाने आरोपी गेला गोंधळून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2018 10:31 IST

फेसबुकवरुन मैत्री झाल्यानंतर मित्राला भेटायला नालासोपारा येथे गेलेल्या अंकिता मोरे या 20 वर्षीय तरुणीची रविवारी हत्या झाली. या प्रकरणात नवीन धक्कादायक तथ्य समोर आले आहे.

ठळक मुद्देरविवारी पहिल्यांदाच अंकिता त्याला भेटायला नालासोपारा पूर्वेला त्याच्या घरी गेली होतीनिरगुडेने लैंगिक जबरदस्ती केल्यानंतर अंकिताच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु झाला.

ठाणे - फेसबुकवरुन मैत्री झाल्यानंतर मित्राला भेटायला नालासोपारा येथे गेलेल्या अंकिता मोरे या 20 वर्षीय तरुणीची रविवारी हत्या झाली. या प्रकरणात नवीन धक्कादायक तथ्य समोर आले आहे. अंकिताने आरोपी हरिदास निरगुडेची (21) सेक्सची मागणी फेटाळून लावल्यामुळे संतापलेल्या  हरिदासने  बुटांच्या लेसच्या सहाय्याने अंकिताचा गळा आवळून निर्घृण हत्या केली असे सुरुवातीला समोर आले होते. पण आता हरिदासने अंकितावर लैंगिक जबरदस्ती केल्याची कबुली दिली आहे. 

तिचा शवविच्छेदन अहवाल मिळाल्यानंतर याबद्दल अधिक स्पष्टता येईल. वाशीला राहणा-या 20 वर्षीय अंकिता मोरेची फेसबुकच्या माध्यमातून हरिदास निरगुडे नावाच्या 25 वर्षीय तरूणाशी मैत्री झाली होती. रविवारी पहिल्यांदाच अंकिता त्याला भेटायला नालासोपारा पूर्वेला त्याच्या घरी गेली होती. अलकापुरी भागातील तानिया मोनार्क या चार मजली इमारतीत हरिदास निरगुडे तळमजल्यावर राहतो. सहा महिन्यांपूर्वी निरगुडेची अंकिताबरोबर फेसबुकवरुन मैत्री झाली होती.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार निरगुडेने लैंगिक जबरदस्ती केल्यानंतर अंकिताच्या शरीरातून रक्तस्त्राव सुरु झाला. रक्त येत असल्यामुळे अंकिताने घरातून बाहेर जाण्यास नकार दिला. त्यामुळे हरिदास गोंधळून गेला. हरिदास त्याच्या बहिणीसोबत राहतो. कुठल्याही क्षणी बहिण घरी येईल आणि अंकितासोबत अशा अवस्थेत पाहिले तर आपली रवानगी थेट गावी होईल अशी भिती हरिदासला होती. त्याच भितीपोटी गोंधळलेल्या हरिदासने बुटांच्या लेसच्या सहाय्याने अंकिताचा गळा आवळून निर्घृण हत्या केली. 

इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाने अंकिताचा मृतदेह सुमारे 7.15 वाजता तळमजल्याशेजारच्या जिन्यावर पाहिला,  त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. या इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता अशी माहिती आहे. पोलिसांनी अंकिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून आरोपीला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याने गुन्हा कबूल केला आहे. निरगुडे एका गिफ्ट शॉपमध्ये सेल्समनची नोकरी करतो. त्याने अंकिताला घरी बोलावले होते.  

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखून