शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

तलासरी तालुक्यातील आश्रमशाळांमध्ये परीक्षा?;शिक्षकांना उपस्थिती सक्तीची, नाराजीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 00:07 IST

तलासरी या आदिवासी भागात ऑनलाइन अभ्यास घेणे कठीण आहे.

तलासरी : काेरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा, कॉलेज बंद आहेत. मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मुलांच्या घरी जाऊन त्यांचा अभ्यास घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्यात येऊ नयेत, असे शासनाने निर्देश दिले आहेत. मात्र, तलासरी तालुक्यातील आश्रमशाळांच्या मुलांच्या परीक्षा घेण्याचे आदेश डहाणू प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिल्याने तसेच शाळांमध्ये दररोज येण्याचे बंधनकारक केल्याने शिक्षकांतून नाराजी व्यक्त होत आहे.

तलासरी या आदिवासी भागात ऑनलाइन अभ्यास घेणे कठीण आहे. नेटवर्कचा प्रॉब्लेम, मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती यामुळे बहुतांश मुलांकडे स्मार्ट फोन नाहीत. त्यामुळे शिक्षकांना मुलांना शिकवणे कठीण झाले आहे. तसेच, मुलांना पुस्तकेही दिली नसल्याने मुले परीक्षा कशी देणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आश्रमशाळांच्या शिक्षकांना दररोज शाळांमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी ५ येऊन नंतर गावपाड्यात जाऊन तेथून लोकेशन दाखवणे सक्तीचे केले आहे. ऑनलाइन शिक्षण देणे बंधनकारक असताना शिक्षकांना शाळांमध्ये बाेलावले जात असल्याने त्यांच्यातून नाराजी व्यक्त हाेत आहे.

परीक्षा नव्हे, वर्कशीट साेडवण्याचे आदेश

प्रकल्प कार्यालयाकडून कोणत्याही परीक्षा घेण्याचे नियोजन नाही. १५ जूनपासून मुलांचा ऑनलाइन अभ्यास घेणे, तसेच घराेघरी जाऊन त्यांना शिकवण्याचे निर्देश दिले असल्याचे प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. काही शिक्षक याबाबत टाळाटाळ हाेत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. तसेच मुलांना सराव असावा म्हणून त्यांना वर्कशीट देऊन त्या सोडवून घेण्यास सांगण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्यात येत नसल्याचे मित्तल म्हणाल्या.

टॅग्स :SchoolशाळाVasai Virarवसई विरार