शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

एसटीच्या भूखंडावर अतिक्रमण

By admin | Updated: December 16, 2015 00:25 IST

या शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर गरीबांची जीवनवाहिनी असलेल्या ‘एस टी’ला रेल्वेस्टेशन परिसरातून बाहेर फेकल्यामुळे मोकळ्ी झालेली

- हितेन नाईक,  पालघरया शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याच्या नावावर गरीबांची जीवनवाहिनी असलेल्या ‘एस टी’ला रेल्वेस्टेशन परिसरातून बाहेर फेकल्यामुळे मोकळ्ी झालेली जागा रिक्षावाले खाजगी वाहनधारक, भाजी विक्रेत्यांनी बळकावली आहे. अनधिकृत खाजगी वाहतुकीमधून महिन्याकाठी मिळणाऱ्या आर्थिक मलिद्याच्या हव्यासापोटी गरीबांच्या जीवनवाहिनीचा कणा मोडण्याचे काम काही लोक करीत असल्याचा आरोप प्रवासी करीत आहेत. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी यामध्ये हस्तक्षेप करून एस.टी व खाजगी वाहतुकीमध्ये सुवर्णमध्य साधावा अशी मागणी केली जात आहे.पालघरमध्ये १ जून १९५२ पासून सुरू झालेल्या एस.टी सेवेने अल्पावधीतच त्यावेळच्या खाजगी सेवेकडून प्रवासीवर्गाला आपल्याकडे वळविण्यात यश मिळविले होते. सन १८७० च्या सुमारास त्यावेळच्या बॉम्बे बडोदा व सेंट्रल इंडीया रेल्वे सुरू झाल्यानंतर तत्कालीन मुंबई महानगरपालिकेने जनतेच्या सोयीसाठी पालघर रेल्वे स्टेशन बाजूची २ कि. मी. ची जागा रेल्वेला उपलब्ध करून दिली होती व त्यातला काही एस.टीला दिल्याने सन १९५२ पासून पालघरमध्ये एस.टी सेवा सुरू झाली. कालांतराने प्रवाशांनी मोठ्या प्रमाणात एस.टी.ला स्वीकारल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला जागेची कमतरता भासू लागली. त्यानंतर राज्यपालांच्या परिपत्रकानुसार २३जानेवारी १९९८ ला नवीन बस स्थानक सुरू होईपर्यंत ६३२ चौ. मीटरची जागा स्टेशनजवळ उपलब्ध करून देण्यात आली. तत्कालीन खासदार व उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या खासदार निधीमधून चार लाख खर्च करून त्या जागेत प्रवासी निवाराशेडही बांधण्यात आल्याने मोठ्या जोमाने बससेवा सुरू झाल्याचे माहीम सेवा समितीचे अध्यक्ष जयवंत चौधरी यांनी लोकमतला सांगितले. दरम्यानच्या काळात शहरातील वाहतुक सुरळीत करण्याच्या नावाखाली प्रथम स्टेशन जवळच्या टपऱ्या तोडून त्यांचे १ कि. मी. लांब मनोर रोडवर पुनर्वसन करण्यातआले होते. पालघर जिल्ह्याच्या नवनिर्मितीच्या संकेतामुळे पालघर रेल्वे स्टेशन परिसर व शहरातील वाहतूक सुरळीत करण्याच्या नावावर पुन्हा पालघर नगरपालिकेसह प्रशासनाने दुसरा घाला घातला तो गरीबांच्या एस.टी सेवेवर. सन २०११ मध्ये पालघर नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांनी पालघर एस.टी विभागाच्या व्यवस्थापनाला नोटीस बजावून शहरातील वाहतूक व्यवस्थेमध्ये सुधारणा घडविण्याच्या नावाखाली रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडून होणारी बससेवा पूर्वेकडील एस.टी विभागाच्या जागेतून १९ डिसेंबर २०११पासून सुरू करण्यास बजावले. यामध्ये नंतरच्या काळात झालेल्या बैठकीनुसार सातपाटी, केळवा, वडराई, खुताडपाडा, बोईसर इ. मोजक्याच फेऱ्या स्टेशन परिसरातून सोडून बाकी सर्व मध्यम पल्ला व लांब पल्ल्याच्या बसेस पालघर आगारातून (१कि. मी.लांबून) सोडण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत.महिनाकाठी २ कोटी १० लाखांचा तोटा खाजगी वाहनधारकांचे हित व महिन्याकाठी मिळणाऱ्या आर्थिक मलिद्याचे हित डोळ्यासमोर ठेवून घेतलेल्या या निर्णयाने पालघर आगाराचे आर्थिक गणितच कोलमडून पडल्याचे एस.टी विभागाचे म्हणणे आहे. आज आमच्या ६८० बस फेऱ्याच्या दररोजच्या २१ हजार कि. मी. च्या पल्ल्यामधून दररोज २ लाख असा महिनाकाठी २ कोटी १० लाखाचा तोटा सहन करावा लागत असल्याचे पालघर डेपो कार्यालयाने सांगितले. याला कोणाचा आशिर्वाद ?पालघर रेल्वे स्टेशन समोरील जागेमधून एस.टीला तडीपार केले. आज त्याच ठिकाणी ३ व ६ आसनी रिक्षा उभ्या आहेत. यातील अनेक रिक्षा अनधिकृत असल्याने याला कोणाचा आशिर्वाद आहे? असा प्रश्न आहे. एस.टी सारख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आर्थिक कंबरडे मोडून खाजगी वाहतुकीला छुपा पाठींबा देणाऱ्यांचा बुरखा उघड करणे गरजेचे असून एस.टी. वाचविण्यासाठी सर्वांनी पुढे यावे असे मत सेवा समितीचे अध्यक्ष चौधरी यांनी व्यक्त केले आहे. परिवहन मंत्र्याशी पत्रव्यवहारएस.टी. वाचविण्यासाठी ते काँग्रेस, राष्ट्रवादी, युती सरकारचे उंबरठे झिजवत असून परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे त्यांनी पत्रव्यवहारही सुरू केल्याचे सांगितले. प्रशासनाने तीन वर्षे विविध उपाययोजना केल्यात. एस.टीच्या रिकामी केलेली जागा खाजगी वाहतुक व फेरीवाले यांना देवून कुणाचे हात ओले झाले, याचा शोध जिल्हाधिकारी अभिजीत बांगर यांनी घ्यायला हवा व अनधिकृत रिक्षा, फेरीवाले यांना हटवून एस.टी व रिक्षा यांचा समन्वय साधून दोघांकडून प्रवाशांना कशी चांगली सेवा देण्याचा प्रयत्न कराव, अशी प्रवाशांची मागणी आहे.