शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

उघडीप मिळाल्याने लागवडीला जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 23:29 IST

ठिकठिकाणी बळीराजा शेतात लागवाडीसाठीची जोरदार तयारी करू लागला आहे

- निखील मेस्त्रीपालघर : पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील लागवडीची कामे जोमात सुरु झाली आहे. ठिकठिकाणी बळीराजा शेतात लागवाडीसाठीची जोरदार तयारी करू लागला आहे. २३ जुलैपर्यंत आठ तालुक्यात एकूण ४२ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रावर भाताची रोपणी झाली आहे. याची टक्केवारी ५५.७४ टक्के झाल्याचे कृषी विभागाने सांगितले.यामध्ये सर्वाधिक रोपणी डहाणू तालुक्यात झाली आहे. या तालुक्यात ९ हजार ६०६ हेक्टर क्षेत्रावर रोपणी जहलेली आहे. त्याखालोखाल तलासरी तालुक्यात ६ हजार ६४६ हेक्टर, वाडा तालुक्यात ६ हजार ३७८ हेक्टर, पालघर तालुक्यात ६ हजार ५० हेक्टर, वसई तालुक्यात ५ हजार २४९ हेक्टर, जव्हार तालुक्यात ३ हजार ९५० हेक्टर, विक्र मगड तालुक्यात ३ हजार २१० हेक्टर तर सर्वात कमी रोपणी मोखाडा तालुक्यात असून ती १ हजार ४९० हेक्टर इतकी आहे. भाताच्या बी पेरण्या झाल्यानंतर काही काळाने रोपवाटिका तयार होण्याच्या काळात पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपून काढले होते. पावसाचे पाणी या रोपवाटिकांमध्ये साचून राहिल्याने काही ठिकाणी ती रोपे कुजली तर काही ठिकाणी रोपे कमी प्रमाणात आल्याने शेतकऱ्यांना पूर्ण रोपणी करू शकणार नसल्याचे दिसते आहे. भातासोबत जिल्ह्यात ३३३३ हेक्टर क्षेत्रावर नागली, २ हजार ३०७ हेक्टर क्षेत्रावर वरई, १ हजार ३७६ हेक्टर क्षेत्रावर तूर, १ हजार १३६ हेक्टर क्षेत्रावर उडीद, ३३ हेक्टर क्षेत्रावर मूग, ८६ हेक्टर क्षेत्रावर चवळी, ३४ हेक्टरवर भुईमूगाची लागवड झाली आहे.पाच तालुक्यांत नागलीची लागवड चांगलीवसई, पालघर,तलासरी तालुके वगळता इतर पाच तालुक्यात नागलीची लागवड बºयापैकी झालेली आहे. यामध्ये डहाणूत १९ हेक्टर, वाड्यात ७६ हेक्टर, विक्र मगडमध्ये ५५० हेक्टर, जव्हार ८२७ हेक्टर व मोखाडा १ हजार ८६० हेक्टरवर प्रत्यक्ष नागली आहे.वरई पिकाखाली वाडा तालुक्यात ८१ हेक्टर, विक्र मगड ५६.६० हेक्टर, जव्हार ४२८ हेक्टर तर मोखाडा तालुक्यात १ हजार ७४०हेक्टर क्षेत्र आहे.तूर पीकखाली डहाणू तालुका ९५ हे, तलासरी ५३ हे, वाडा ३१५ हे, विक्र मगड १९० हे,जव्हार ६२३ हे तर मोखाडा १०० हेक्टर खाली आहे.उडीद पिकाखाली डहाणू तालुका ८५ हे, तलासरी १६ हे, वाडा २५६ हे, विक्र मगड १७३ हे, जव्हार ७ हे, मोखाडा तालुका ६०० हेक्टर जमीनीवर लागवड आहे.मूग पिकाचे क्षेत्र मोखाडा तालुका ३४ हेक्टर असून कुळीथ व चवळी पिकाखालचे क्षेत्र वाडा तालुक्यात ८४ हेक्टर तर तलासरी तालुक्यात २ हेक्टरच आहे.भुईमूग क्षेत्रात मोखाडा तालुक्यात २७ हेक्टर तर वाडा तालुक्यात ७ हेक्टर इतके आहे.तीळ पिकाखाली मोखाडा तालुक्यात २६ हेक्टर तर वाडा तालुक्यात २८ हेक्टर क्षेत्र आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार