शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

तलासरी, डहाणूत पुन्हा भूकंपाचे धक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 1:07 AM

जिल्ह्यात चिंतेचे वातावरण : डहाणूत एनडीआरएफ पथकाची पाहणी

डहाणू : पालघर जिल्ह्यात धुंदलवाडी येथे शनिवारी रात्री साडेदहा वाजता ३.२ तीव्रतेचा आणि रविवारी १२.४० च्या सुमारास भूकंपाचा तीव्र धक्का बसला. लागोपाठ धक्के बसल्याने सुरक्षिततेचा उपाय म्हणून ग्रामस्थ घराबाहेर पडले. डहाणू तालुक्यातील आशागड, सावटा, नागझरी, घोलवड तसेच गुजरात राज्याच्या सीमावर्ती भागात या भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, एनडीआरएफच्या २१ अधिकाऱ्यांच्या टीमने डहाणू तलासरी भागातील भूकंप भागाचा दौरा करून पाहणी केली.तलासरी - डहाणू भागात भूकंपाचे सत्र सुरूच असून या सततच्या भूकंपाने नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. तीन दिवसांपासून पुन्हा येथे धक्के बसायला सुरुवात झाली असून शुक्र वारी ३.५, ३.२, २.६ रिष्टर चे तीन धक्के, शनिवारी ३.२ चा धक्का तर रविवारी दुपारी १२.४७ ला पुन्हा ३.४ रिष्टर स्केलचा मोठा धक्का बसला.दरम्यान, भूकंपाने या भागातील घरे अंगणवाड्या, शाळाना तडे जाऊन त्या धोकादायक झाल्या आहेत त्यातच सततच्या पावसाने त्या अति धोकादायक झाल्याने त्या घरात राहायचे कसे हा प्रश्न नागरिकांना पडला असून जीव घरून ते राहत आहेत त्याच प्रमाणे धोकादायक शाळा अंगणवाड्यात आपल्या लहान बालकांना पाठवायला पालक धजावत नाहीत.प्रशासन स्तरावर आपत्कालीन विभाग सतर्क असला तरीही दररोज घडणाºया या लहान मोठ्या धक्क्यांनी प्रशासन हतबल झाले आहे. याबाबत प्रशासनाकडून भूकंप प्रवण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात आहे. अनेक गावांमध्ये तंबू उभारले असून कित्येक शाळा आणि गावांमध्ये आपत्कालीन उपाययोजना करण्याबाबत प्रशासन कार्यरत आहे.माङया घरात दुपारी १२.४० वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा मोठा धक्का जाणवला. घरातील भांडीकुंडी पडल्याने सर्वजण घाबरून घराबाहेर पडलो.- चेतन अबोले, ग्रामस्थ, सावटा

टॅग्स :Earthquakeभूकंप