शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘वॉटर व्हील’मुळे महिलांच्या डोक्यावरील ओझे झाले कमी; पाण्याची वाहतूक झाली सोपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 09:34 IST

ग्रामीण भागात पाणीटंचाईग्रस्त भागात होतोय सर्रास वापर

हुसेन मेमन, लोकमत न्यूज नेटवर्क, जव्हार: अतिदुर्गम आदिवासी तालुका म्हणून जव्हारची ओळख आहे. येथील डोंगर, दरी-कपारीत लोकवस्ती वसलेली आहे. या भागातील उन्हाळ्याच्या दिवसांत पाण्याची टंचाई नेहमीच भासते. त्यामुळे महिलांना अनेक किमीवरून पाण्याचे हंडे भरून डोक्यावरून वाहावे लागतात. यावर मात करण्यासाठी आता ‘वॉटर व्हील’ उपलब्ध झाले आहे. यामुळे महिलांच्या डोक्यावरचे ओझे कमी झाले असून, किमान दोन-तीन हंडे पाण्याची सहज वाहतूक करणे सोपे होत आहे.

सरकारी तरतूद नसल्याने व व्हीलची किंमत जास्त असल्याने गरीब आदिवासी लोकांना खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे सामजिक संस्थांच्या वाटपावरून येथील गरजूंना निर्भर राहावे लागत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे वॉटर व्हीलने पाणी वाहतूक करण्यासाठी काही सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला आहे. लांबहून पाणी वाहतूक करणाऱ्या गावपाड्यांना याचा फायदा होत आहे. वॉटर व्हीलची साधारण ४५ लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. 

  • अशी आहे रचना

-वॉटर व्हील प्रत्यक्षात आफ्रिका देशातून भारतात विकसित झाली आहे. ही पद्धत आधी तिथे अवलंबली गेली, त्याला यश मिळाल्याने भारतात त्याची प्लास्टिक वस्तू बनविणाऱ्या मोठ्या निर्मात्या कंपन्यांनी विकसित करून बाजारात उपलब्ध करून दिली आहे. -साधारण या वॉटर व्हीलची किंमत चार हजारांपर्यंत आहे. पाणी भरताना एका बाजूला झाकण देण्यात आले असून, त्यात पाणी भरून टायरसारखे ढकलत थेट पाणी घरापर्यंत नेता येते. वाहतुकीस सोपे असल्याने याला जास्त पसंती दिली जात आहे. -वॉटर व्हीलमुळे ग्रामीण भागातील टंचाईग्रस्त भागात याचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र, सरकारकडून अद्याप वॉटर व्हीलसाठी वेगळी तरतूद नसल्यामुळे सामाजिक संस्थांच्या माध्यमांची वाट बघावी लागत आहे.

उच्च दर्जाचे जाड प्लास्टिक पावडर कोटेड कोट वापरून गोल आकार देऊन टायरसारखे ड्रम बनवून त्याला हाताने ढकलण्यासाठी दोन्ही बाजूंनी लोखंडी गोल पाइपद्वारे हॅण्डल तयार करण्यात आले आहेत. वॉटर व्हील हा मानवी पाणी पिण्यासाठी उच्च घनता पॉलिथिलिनचा वापर करून तयार करण्यात आला आहे. जेणेकरून यातून आणलेले पाणी शुद्ध व मानवी जीवनात योग्य राहील.

टंचाईग्रस्त भाग व लांब-लांबहून पाणी वाहतूक करणाऱ्या गावपाड्यांना वॉटर व्हीलची खूपच गरज आहे. शासनाने वॉटर व्हीलसाठी वेगळी तरतूद करावी. यामुळे ग्रामीण जनतेला दिलासा मिळेल.- सुरेश गवळी, ग्रामस्थ, शिरोशी, जव्हार

टॅग्स :palgharपालघरWaterपाणी