शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याअभावी वेळेवर उपचार न मिळाल्याने दीड महिन्याच्या चिमुकलीचा करुण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 06:29 IST

आदिवासी पाड्यांवर सुविधांचा दुष्काळ

वाडा/विक्रमगड (जि. पालघर) : गारगाई व पिंजाळ नदी बेटावर असलेल्या म्हसेपाडा येथील दीड महिन्याच्या चिमुकलीला रस्त्याअभावी वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाला.    लावण्या नरेश चव्हाण (वय ४२ दिवस) असे या बालिकेचे नाव आहे.

प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा हा बळी असल्याचा आरोप होत आहे.  वाडा व विक्रमगड तालुक्याच्या हद्दीवर तसेच गारगाई व पिंजाळ नदीच्या बेटावर म्हसेपाडा हे गाव आहे. गावाची लोकसंख्या अवघी २०० च्या आसपास आहे. वाडा येथे ग्रामीण रुग्णालय व विक्रमगड तालुक्यातील मलवाडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून ते या आदिवासी पाड्यापासून दूर आहे. लावण्याला सोमवारी रात्री ताप आला होता. कुटुंबियांनी घरगुती उपचार केले, मात्र त्यानंतर तिला श्वासोच्छ्वास घ्यायला त्रास होऊ लागला. त्यामुळे पहाटे तिला पायवाटेने मलवाडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी घेऊन जात असतानाच वाटेत तिचा मृत्यू झाला. न्यूमोनियाने हे बाळ दगावल्याची माहिती विक्रमगडचे तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. संदीप निंबाळकर यांनी दिली.  

रुग्णाला न्यावे लागते डोलीत पाड्यावर रस्ता नसल्याने बाजार, शाळा-महाविद्यालय व रुग्णालयात जाण्यासाठी नागरिकांना पायी प्रवासा करावा लागतो. अजूनही पाड्यावर रस्ते आणि आरोग्याच्या सुविधा नाहीत. त्यामुळे रुग्णाला डोलीत न्यावे लागते. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पावसाळ्यात सर्पदंशाने अनेकांना जीव गमवावा लागतो.   

पाड्यावरील नदीपात्रात पुलाची मागणी मागील वर्षी करण्यात आली होती, परंतु पूल मंजूर झालेला नाही.- एस. एम. पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअभियंता