शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्यातील विषारी वायूमुळे तारापूर एमआयडीसीत पळापळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2019 00:56 IST

तारापूर एमआयडीसीमध्ये सांडपाण्यातील विषारी वायुमुळे शनिवारी रात्री श्वसन व डोळे चुरचुरण्याचा त्रास जाणवू लगल्याने के झोनमध्ये भीती पसरून सर्वत्र पळापळ झाली.

- पंकज राऊतबोईसर : तारापूर एमआयडीसीमध्ये सांडपाण्यातील विषारी वायुमुळे शनिवारी रात्री श्वसन व डोळे चुरचुरण्याचा त्रास जाणवू लगल्याने के झोनमध्ये भीती पसरून सर्वत्र पळापळ झाली. मात्र एवढी गंभीर घटना घडूनही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दुपारी एक वाजता घटनास्थळी पोहचले तर पत्रकारांना घटनेची अगदी त्रोटक माहिती म.प्र.नि.मं.च्या अधिकाऱ्यांनी दिलीऔद्योगिक क्षेत्रातील के झोन मध्ये असलेल्या प्लॉट नंबर के. दहा व अकरा मधील खन्ना अ‍ॅण्ड खन्ना लिमिटेड या रासायनिक कारखान्याच्या समोरून जाणाºया नाल्यामध्ये विषारी व दुर्गंधीयुक्त वायुमिश्रीत घातक रासायनिक सांडपाणी शनिवारी रात्री अनधिकृतपणे सोडल्याने त्या परिसरातील कारखान्यात काम करणाºया कामगारांना व रस्त्यावरून ये-जा करणाºया असंख्य नागरिकांना डोळ्यांची जळजळ व श्वसनास त्रास, मळमळ इत्यादी प्रकारचे त्रास जाणवू लागल्याने कामगार काम बंद करून सुरक्षित स्थळी पळाले.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तारापुर एक चे उप प्रादेशिक अधिकारी मनीष होळकर के झोन मधील कारखान्यात जाऊन पाहणी करु न सांड पाण्याचे नमुने घेत होते. त्या दरम्यान त्यांनी खन्ना अ‍ॅण्ड खन्ना लिमिटेड या कारखान्याच्या प्रवेशद्वारा जवळील जुन्या व बंद करण्यात आलेल्या सांडपाण्याच्या लाईनचे चेम्बर उघडायला लावून पाहणी केली असता त्या बंद परंतु अनिधकृतपणे वापरात असलेल्या लाइन मधील काळ्या व तेलकट रसायनाचा उग्र वास येवून डोळेही चुरचुरत होते. त्याचेही नमूने घेण्यात आले आहेत.घटनास्थळी तारापूर अग्निशमन दलाची एक गाडी व जवान दुपारी साडे बारा पासून तत्परतेने हजर होते तर पोलीस परिसराची पाहणी करून गेले मात्र यासंदर्भात पोलीस ठाण्यामध्ये कुणीही तक्रार नोंदविली नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं तर निश्चित घटना काय किती जणांना त्रास झाला.यासंदर्भात प्राथमिक माहितीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपस्थित अधिकाऱ्यांकडून मिळाली नाही तर यासंदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी लाड यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर माहिती दिली जाईल असे सांगितले. तर आॅक्टोबरमध्ये अशीच घटना घडून २१ चिमण्या मेल्या होत्या त्या घटनेची ही पुनरावृत्ती झाली असून तारापूर गॅस चेम्बर बनत असल्याची भीती रहिवाश्यांकडून व कारखानदारांकडून व्यक्त होत आहे .>शनिवार व रविवार या दिवशी प्रशासनाला सुट्टी असते त्यावेळेस मोठया प्रमाणात कारखाने अवैधरित्या प्रदूषण करत असतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी सुटीच्या दिवशी व रात्रीच्या वेळी गस्त घालणे आवश्यक असताना ते ती घालत नाहीत.- मनीष संखे, अध्यक्ष,पर्यावरण दक्षता मंच तारापूर>प्लॉट नंबर के १५ मधील आझाद इंडस्ट्रीज या कारखान्यातील कामगार मध्यरात्री काम सोडून पळाले तर रविवारी सकाळी ही पहिल्या पाळीतील कामगार घरी परत गेलेत- जय किसन यादव,मेन्टेनन्स इन्चार्जआझाद इंडस्ट्रीज तारापूर