शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
5
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
6
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
7
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
8
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
9
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
10
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
11
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
12
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
13
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
14
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
15
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
16
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
17
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
18
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
19
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 

ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त; साडेपाच कोटींचा माल जप्त, नालासोपारा येथे पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2025 14:53 IST

नालासोपारा : प्रगतिनगर परिसरातून तुळींज पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. कारखाना चालविणाऱ्या  नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले ...

नालासोपारा : प्रगतिनगर परिसरातून तुळींज पोलिसांनी मेफेड्रोन ड्रग्जचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. कारखाना चालविणाऱ्या  नायजेरियन महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळावरून पोलिसांनी ५ कोटी ६० लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे नालासोपाऱ्यात ड्रग्ज विक्रीच नाही तर मोठ्या प्रमाणात ड्रग तयारही होत असल्याचे समोर आले. एका इमारतीमध्ये घरात हा कारखाना सापडल्याने पोलिसांनी कारवाई केली. 

पोलिस उपनिरीक्षक राहुल फड यांना मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी नालासोपारा पूर्वेकडील प्रगतिनगर परिसरातील अंशित प्लाझा या इमारतीच्या रूम नं. ४०५ येथे पोलिसांनी छापा टाकला असता घरात ड्रग्जचा कारखाना सुरू असल्याचे आढळले. यावेळी आरोपी नायजेरियन महिला रिटा कुरेबेवाई (वय २६) हिला पोलिसांनी अटक केली. तिच्या घरातून मेफेड्रोन ड्रग्ज बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल, ड्रग्ज बनवण्याचे साहित्य असा एकूण ५ कोटी ६० लाख ४० हजार १५० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. महिलेचा प्रियकर फरार आहे. 

पोलिस पथकाने ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. एका नायजेरियन महिलेला अटक केली आहे. एक आरोपी फरार आहे. त्याचा शोध  सुरू आहे. विजय जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, तुळींज पोलिस ठाणे.

भारतात वास्तव्याचा       व्हिसा नसल्याचे स्पष्टआरोपी महिलेकडे भारतात वास्तव्य करण्यासाठी आवश्यक असलेला व्हिसा आढळलेला नाही. त्यामुळे स्थानिक पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पोलिस आयुक्तालयामधील नालासोपारा परिसरात नायजेरियन नागरिकांची संख्या मोठी आहे. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थPoliceपोलिस