ड्रेजरची रेल्वे पुलाला धडक; ११ जणांना ताब्यात घेतले, सिमेंटचे दोन ब्लॉक तुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2018 12:32 AM2018-03-21T00:32:29+5:302018-03-21T00:32:29+5:30

रेती उत्खनन करणा-या ड्रेजरने वसई खाडीवरील जुन्या रेल्वे पूलाला धडक दिल्याने पूलाचे नुकसान झाले. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ड्रेजरसह ११ जणांना ताब्यात घेतले आहे.

Dreger's railway bridge hits; 11 people were taken into custody, two blocks of cement were broken | ड्रेजरची रेल्वे पुलाला धडक; ११ जणांना ताब्यात घेतले, सिमेंटचे दोन ब्लॉक तुटले

ड्रेजरची रेल्वे पुलाला धडक; ११ जणांना ताब्यात घेतले, सिमेंटचे दोन ब्लॉक तुटले

Next

वसई : रेती उत्खनन करणा-या ड्रेजरने वसई खाडीवरील जुन्या रेल्वे पूलाला धडक दिल्याने पूलाचे नुकसान झाले. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ड्रेजरसह ११ जणांना ताब्यात घेतले आहे.
वसई खाडीत रेती उत्खनन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे ड्रेजरने रेती उत्खनन केले जाते. सोमवारी रात्री एक ड्रेजर रेती उत्खनन करण्यासाठी रेल्वे पूलाखालून जात असताना पूलाच्या पोलला धडकून अडकला. भरती सुरु असताना ड्रेजर चालकाने ड्रेजर पूलाखालून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ड्रेजर पूलाखाली अडकला गेला. त्यामुळे रेल्वे पूलाचे सिमेंटचे ब्लॉक तुटून पडले. त्यामुळे दोन पूलाचे नुकसान झाले. याची माहिती मिळताच बंदर अधिकाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री ड्रेजर पूलाखालून काढून जप्त करण्यात आला.
सहाय्यक बंदर निरीक्षक विश्वास कांबळे यांनी वसई पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून ड्रेजर जप्त केला. तसेच ड्रेजरवर असलेल्या अकरा खलाशांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान, वसई खाडीतून रेती उत्खनन करण्यास मनाई करण्यात यावी अशी मागणी पाचूबंदर, कोळीवाडाकरांची मागणी आहे. जुना रे्ल्वे पूल वाहतूकीसाठी बंद असल्याने ड्रेजरने धडक दिल्याने कोणताही परिणाम झाला नाही. मात्र, या पूलाला समांतर दुसरा पूल असून त्यावरून पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु असते. जर त्यास धडक दिली असती तर मोठा अनर्थ होऊ शकला असता.

कोर्टामध्ये याचिका
रेती उत्खननामुळे पावसाळ््यात गावात पाणी शिरते तरीही पूलाखालून रेती उत्खनन केले जात असल्याने पूलाला धोका होऊ शकतो, अशीही तक्रार कोळी युवा शक्तीने केली होती. तसेच मुंबई हायकोर्टात जनहित याचिकाही दाखल केली होती. मात्र, जिल्हाधिकाºयांनी रेती उत्खननास परवानगी दिली गेल्याने सध्या ड्रेजरच्या साहय्याने रेती उत्खनन केले जात आहे.

Web Title: Dreger's railway bridge hits; 11 people were taken into custody, two blocks of cement were broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.