शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दरोड्याआधीच टोळीला अटक, पद्मावती ज्वेलर्सवर टाकणार होते दरोडा, अनेक राज्यांत केले आहेत गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 04:15 IST

डहाणू च्या पद्मावती ज्वेलर्स वर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या आंतर राज्यीय टोळीतील कुख्यात पाच दरोडेखोरांना पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

- हितेंन नाईकपालघर : डहाणू च्या पद्मावती ज्वेलर्स वर दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या आंतर राज्यीय टोळीतील कुख्यात पाच दरोडेखोरांना पालघरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाºयांनी अटक केल्याची माहिती पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.३० आॅक्टोबर रोजी रात्रौ ३.३० वाजता डहाणू रोड स्टेशन वरील सागर नाका येथील पद्मावती ज्वेलर्सच्या समोर एक पांढºया रंगाची कार संशयास्पदरित्या उभी असल्याचे गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाणे, सहा. पो. उपनिरीक्षक भरत पाटील, नरेश जनाठे ह्यांना दिसली. त्यांनी त्या कार मधील पाच जणांची कसून चौकशी केली असता त्यांच्या बोलण्यात विसंगती आढळून आली. त्यांच्या कारची तपासणी केली असता बॅगेत हायड्रोलिक कटर, ड्रिल मशीन, लोखंडी कटावण्या, मिरची पूड इ.साहित्य आढळून आले.तात्काळ त्या सर्वाना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आपण पद्मावती ज्वेलर्सवर दरोडा घालण्याच्या तयारीत असून समोरील देना बँकेच्या वॉचमनला बांधून ठेवण्याच्या प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले.ह्या प्रकरणात मोहम्मद हुसेन सिद्दीकी (वय ३२ वर्ष) रा.अहमदाबाद, जसाराम देवासी (२३ वर्ष)अश्विन ठाकूर (३२),गणेशराम चौधरी (२३), देवीलाल उर्फ देवजी चौधरी (२४) सर्व राहणार राजस्थान ह्यांना अटक केली आहे. हे आरोपी ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यापूर्वी अनेक महिने त्याची टेहळणी करून सर्व माहिती गोळा करायचे.त्यांनी आतापर्यंत बँगलोर कॉटन पेठ हद्दीतील ज्वेलर्स दुकान, एल्फिस्टन रोड येथील रांका ज्वेलर्स, पालघरचे नॅशनल ज्वेलर्स, पिंपरी चिंचवड मधील अंबिका ज्वेलर्स, विक्र ोळी पार्क साईट मधील राजू ज्वेलर्स, राजस्थान दुजाना येथील ज्वेलर्स लुटल्याची कबुली दिली आहे. ह्या प्रकरणी डहाणू पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आल्या असून आरोपींना न्यायालयाने ८ नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.ह्या प्रकरणाचा पुढील तपास सपोनि. मनोज चाळके, व बोईसर युनिटचे सहा. फौजदार विनायक ताम्हाणे, भरत पाटील,हवालदार दीपक राऊत, संदीप सूर्यवंशी, सचिन मर्डे, जनार्दन मते, रामचंद्र पाटील हे करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हा