शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

भाडोत्री बैल व्यवहारासही आता दुष्काळाची झळ, परतीच्या पावसाने भातपिकाचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 00:50 IST

खरीप हंगामात उखळणीच्या कामासाठी तालुक्यातील किनारपट्टीच्या गावातून डोंगरी भागात काबाडाकरिता भाडेतत्त्वावर गेलेले बैल आता माघारी परतले आहेत

- अनिरु द्ध पाटीलडहाणू/बोर्डी : खरीप हंगामात उखळणीच्या कामासाठी तालुक्यातील किनारपट्टीच्या गावातून डोंगरी भागात काबाडाकरिता भाडेतत्त्वावर गेलेले बैल आता माघारी परतले आहेत. मात्र अवकळी पावसाने भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने बैलमालकाला निम्मीच रक्कम देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे.या वर्षी पाऊस लांबल्याने डहाणू तालुक्यातील सुमारे १५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी ९ हजार ६०६.८ हेक्टर भातपिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यामुळे २० हजार ३१९ शेतकरी बाधित झाल्याची शासकीय आकडेवारी आहे. मात्र अज्ञानामुळे कागदपत्र सादर न केलेले तसेच शासकीय नोकरदार आणि सेवानिवृत्त कर्मचारी आणि शेत जमिनीचा ७/१२ नावावर नसलेले अशा प्रकारात मोडणाºया नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. येथील डोंगरपट्ट्यात राहणाºया शेतक-यांचा शेती कसण्याच्या प्रकारानुसार वेगळा गट या तालुक्यात असून तो किनारपट्टीवरील चिंचणी, वरोर, वाढवण, आगर, नरपड, चिखले, घोलवड आणि बोर्डी या गावामधून खरीप हंगामातील भात लागवडीच्या कामाकरिता चार महिन्यांकरिता भाडेतत्त्वावर बैल घेऊन उखळणी, चिखलणी, धान्य आणि पावळीच्या वाहतुकीच्या कामाकरिता वापर केला जातो. मे अखेर ते जून मध्य या काळात मालकांकडून भाडेतत्त्वावर बैल घेऊन जाण्यास प्रारंभ होतो. हा व्यवहार करताना रोख पैसे, धान्य किंवा पावळी यापैकी कोणत्याही एका प्रकारातील हा व्यवहर केला जातो.किना-यालगत गावांमध्ये गुरे चरणाचा अभाव असल्याने पावसाळ्यात जनावरांच्या चा-याचा निर्माण होणारा प्रश्न या व्यवहारामुळे काही अंशी सुटतो. शिवाय नवीन बैलांना नांगरणी, चिखलणी तसेच बैलगाडी ओढण्याकरिता तयार करणे हे जिकरीचे काम असते. त्यामुळे शेतक-यांना तेथे पाठविल्याने अनौपचारिकरित्या ट्रेनिंग स्कूलमधून विनामूल्य प्रशिक्षित बैल मिळतो. अशा पद्धतीने बैलमालकाला या व्यवहारातून अनेक फायदे होतात. तर डोंगरी भागात चढ-उताराची शेती असल्याने पॉवर टिलर चालविणे तितकेसे सोपे नसते. पावसाळ्याव्यतिरिक्त या भागात चारा-पाण्याचा प्रश्न बिकट बनत असल्याने भाडोत्री बैलांचा व्यवहार येथील शेतकºयांसाठीही लाभदायक ठरतो.दरम्यान, अवकाळी पावसामुळे खरिपातील भात पिकाच्या हंगामाला नुकसानीचे ग्रहण लागल्याने भात, पावळी अशा सर्वच प्रकारचे उत्पन्न घटले. यावर्षी भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका बैलाची किंमत २ हजार रुपये एवढी होती. मात्र दुष्काळामुळे तेवढे भाडे देणे परवडणारे नसल्याने निम्मे म्हणजे १ हजार रुपये बैलमालकाला देण्याची नामुष्की ओढवली आहे. बैलांना माघारी आणून ते मालकाला सोपवताना त्यांची घालमेल झाली होती. मात्र जिल्ह्यात सर्वत्र सारखीच परिस्थिती असल्याने आम्हाला समजून घेतले. मात्र नावावर ७/१२ नसल्याने शासनाने समजून न घेतल्याची प्रतिक्रि या भाडेतत्त्वावर बैल घेतलेल्या शेतकºयांनी व्यक्त केली. 

टॅग्स :FarmerशेतकरीVasai Virarवसई विरार