शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
2
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
3
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
4
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
5
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
6
Video - किरण सामंत यांचे स्वतंत्र वाटचालीचे संकेत?; उदय सामंत यांचे बॅनर, फोटो हटवले
7
शरद पवार यांच्या सुनबाई यावेळी दिल्लीला जाणार हे नक्की; चित्रा वाघ यांना विश्वास
8
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
9
पाकिस्तानला करायचीय भारताची बोरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
10
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
11
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
12
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
13
सिद्धू मुसेवाला हत्येचा मास्टरमाईंड गोल्डी ब्रारची अमेरिकेत हत्या: रिपोर्ट
14
सीएसएमटी स्थानकात आज पुन्हा लोकल रुळावरुन घसरली, हार्बर रेल्वे सेवा ठप्प!
15
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
'दिलदार' बुमराहने चिमुरड्याला दिली 'पर्पल कॅप', छोट्या फॅनचा आनंद गगनात मावेना.., पाहा Video

Doctors Day: जीवनदानाबरोबरच समाजभान जपणारे देवदूत; कोरोनाग्रस्त मृतदेहांवर करतात अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 1:12 AM

१ एप्रिल रोजी उसरणी येथील कोरोनाबाधित युवकाचा जिल्ह्यातील पहिला बळी गेल्याने जिल्हात कोरोनाच्या संसर्गाची मोठी भीती पसरली होती.

हितेन नाईक 

पालघर : कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात एका बाधित व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला नकार देत कर्मचारी स्मशानभूमीतून पळून गेल्यानंतर उद्भवलेल्या कठीण परिस्थितीतून मार्ग काढीत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित खंदारे आणि डॉ. उमेश दुप्पलवार यांनी त्या व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार करीत आपले कर्तव्य पार पाडले. डॉक्टर हे जीवनदान देणारे देवदूतच नाहीत, तर सामाजिक भान जपणारे कर्तव्यनिष्ठ नागरिकही आहेत, हे या दोघांनी त्या दिवशी दाखवून दिले.

१ एप्रिल रोजी उसरणी येथील कोरोनाबाधित युवकाचा जिल्ह्यातील पहिला बळी गेल्याने जिल्हात कोरोनाच्या संसर्गाची मोठी भीती पसरली होती. त्या युवकाचा मृतदेह रात्री अंत्यसंस्कारासाठी पालघर पूर्वेकडील स्मशानभूमीत नेण्यात आला. सदर व्यक्तीचा मृत्यू हा कोरोनामुळे झाल्याचे कळताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार करण्यास नकार देत पळ काढला. अशा परिस्थितीत काय करायचे, असा प्रश्न डॉ. खंदारे यांना पडला. अनेक कर्मचाऱ्यांना फोनवर कळवूनही कोणी यायला तयार नसल्याने त्यांनी सोबतीला असलेल्या डॉ. उमेश दुम्पलवार यांच्याकडे पाहिले. दोघांनी त्या व्यक्तीवर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्याचा निश्चय केला आणि बाजूला पडलेली लाकडे गोळा करीत चिता रचली. जणू काही आपल्या घरातल्याचा मृत्यू झाला आहे अशा पद्धतीने या डॉक्टरांनी त्या रुग्णाला अग्नी दिला. यामुळे त्यांच्या कार्याला सर्वच थरातून सलाम केला जात आहे.डॉ. खंदारे यांना मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात काम करीत असताना २६/११ च्या अतिरेकी हल्ल्यात उत्कृष्ट काम केल्याने शासनाने सन्मानित केलेले आहे. आज संपूर्ण तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांची साखळी वाढू नये यासाठी दिवस-रात्र आपल्या टीमसह काम करीत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसdoctorडॉक्टर