दीड लाख कोटींची बुलेट ट्रेन नको: त्यापेक्षा ३५ हजार कोटी खर्चून डहाणू ते विरार रेल्वे चौपदरी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 12:29 AM2019-04-26T00:29:37+5:302019-04-26T06:50:58+5:30

डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या रेल्वेसमस्या कायम

Do not run a bullet train of 1.5 lakh crores: By spending 35 thousand crores, Dahanu wins four-lane train | दीड लाख कोटींची बुलेट ट्रेन नको: त्यापेक्षा ३५ हजार कोटी खर्चून डहाणू ते विरार रेल्वे चौपदरी करा

दीड लाख कोटींची बुलेट ट्रेन नको: त्यापेक्षा ३५ हजार कोटी खर्चून डहाणू ते विरार रेल्वे चौपदरी करा

googlenewsNext

- पंकज राऊत

बोईसर : डहाणू ते वैतरणा दरम्यानच्या लाखो प्रवाशांची उपनगरीय (लोकल ) सेवा ही जीवनदायी असून या मार्गावरील अनेक समस्या लोकसभेच्या अनेक निवडणुका आल्या व गेल्या तरी अजूनही कायम असून त्या लोकप्रतिनिधी व रेल्वे प्रशासनाकडून गांभीर्याने वेळच्या वेळी सोडविल्या न गेल्याने त्याचा प्रचंड मानसिक त्रास आज चाकरमनी, महिला व वयोवृद्ध, अपंग तसेच कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागतो आहे. म्हणूनच पालघर जिल्ह्याला बुलेट ट्रेनची नव्हे तर वैतरणा ते डहाणू, विरार दरम्यानच्या लोकलसेवेच्या समस्या सोडविण्याची गरज आहे.

आता लोकसभेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत आजी - माजी खासदार (जे निवडणूक रिंगणात आहेत) त्याच बरोबर इतर ही उमेदवार आम्ही व आमच्या पक्षाने, संघटनेने डहाणू - विरार दरम्याच्या रेल्वे प्रवाशांचे काही सोडविलेल्या प्रश्नांबरोबरच आम्ही हि कामे केली ती कामे केली असे सांगून स्वत:ची पाठ थोपवून घेऊन मागील प्रलंबित असलेले प्रश्न आम्ही लवकरच सोडवू अशी (प्रत्येक निवडणुकीत देणारी) आश्वासन या वेळीही नेहमीप्रमाणे पुन्हा देतील.

मागील अनेक निवडणुकीत मतदारांनी सर्वच पक्षांना संधी देऊनही रेल्वेचे प्रश्न का सुटले नाहीत. पूर्वी हा मतदार संघ डहाणू व उत्तर मुंबई या दोन मतदार संघात विभागला होता लोकसभेच्या निवडणुकीचा इतिहास पाहिला असता डहाणू मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार दामू शिंगडा पाच वेळा तर एक वेळा शंकर नम निवडून आले होते, दोन वेळा भाजपा -सेना युतीचे चिंतामण वनगा, तर एक वेळा माकपचे लहानु कोम यांना मतदारांनी संधी दिली होती तर उत्तर मुंबईतून पाच वेळा भाजपाचे राम नाईक एक वेळा काँग्रेसचे (परंतु बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकुरांनी पाठिंबा दिलेले) उमेदवार अभिनेते गोविंदा निवडून आले होते. २००९ साली लोकसभेचा पालघर हा (अनुसूचित जमाती करीता राखीव) मतदार संघ नव्याने निर्माण करण्यात आला, पुनर्रचनेनंतर प्रथम बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव, २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे चिंतामण वनगा व पोटनिवडणुकीत भाजपचेच राजेंद्र गावित निवडून आले होते. म्हणजेच आताच्या निवडणुकीतील जवळ जवळ सर्वच पक्षांना येथील भोळ्याभाबड्या मतदारांनी कधी सलग तर कधी आलटून पालटून संधी दिली होती. तरीही त्यातला एकही जण रेल्वेच्या या समस्या सोडवू शकलेला नाही.

प्रवाशांच्या नशिबी अठरा वर्षे ‘वनवास’ कुणामुळे आला? तो संपणार तरी कधी? मग आज प्रत्येक जण विकासाच्या व रेल्वे प्रश्नांबाबत बोलतात मग अजूनही प्रश्न, समस्या व अडचणी का सुटल्या गेल्या नाहीत याचे उत्तर प्रचारा दरम्यान मत मागणारे उमेदवार ,त्यांचे पक्ष व कार्यकर्ते मतदारांना देतील का ?असा प्रश्न त्रस्त रेल्वे प्रवासी विचारत आहेत.

डहाणू रोडपर्यंत उपनगरी क्षेत्र जाहीर झाल्यानंतर तब्बल 18 वर्षांनी प्रत्यक्षात लोकल सेवा सुरु झाली एवढ्या प्रतिर्घ कालावधी लोकल सेवा सुरु करण्या करिता लागला याला रेल्वे प्रशासनाने अनेक अडचणीचे घोडे दामटवून वेळ काढूपणा केला आहे. खंबिर नेतृत्वा अभावीच हे घडले आहे.

डहाणू पासून वैतरणा पर्यंतच्या रेल्वे स्थानकावरून प्रतिदिन सुमारे (सरासरी) एक लाख दहा हजार प्रवासी प्रवास करतात परंतु प्रवाशांना अनेक प्रश्न, समस्या, अडचणी व गैरसोयींना तोंड देऊन प्रचंड मानिसक त्रास सहन करून व जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

Web Title: Do not run a bullet train of 1.5 lakh crores: By spending 35 thousand crores, Dahanu wins four-lane train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.