शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

पालघर पोटनिवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 6:37 AM

पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून २०९७ मतदान केंद्रांवर २८ मे रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकी करिता १२ हजार ८९४ कर्मचारी तसेच चार हजार २१९ सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली.

- हितेन नाईकपालघर - पालघर लोकसभा पोटनिवडणूकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून २०९७ मतदान केंद्रांवर २८ मे रोजी मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकी करिता १२ हजार ८९४ कर्मचारी तसेच चार हजार २१९ सुरक्षा कर्मचारी तैनात असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ प्रशांत नारनवरे यांनी दिली.२०९७ केंद्रांपैकी १४ केंद्रांना क्रिटीकल असून या केंद्रांकडे शासकीय यंत्रणेचे अधिक लक्ष राहणार आहे. पालघर लोकसभा क्षेत्रातिल डहाणू विधानसभा क्षेत्रात ३२७, विक्र मगड मध्ये ३२८, पालघर मध्ये ३१८, बोईसर मध्ये ३३८, नालासोपारा मध्ये ४४९ तर वसई विधान सभा क्षेत्रात ३२७ मतदान केंद्र आहेत. या पैकी डहाणू मधील पतीलपाडा (६३), बोईसर मधील बोईसर (३४), धोंडीपूजा (८५), खैरपडा (२९४) तसेच वळीव मधील तीन केंद्र, नालासोपारा विधानसभा क्षेत्रात निळेमोरे येथील पाच आणि आचोळे येथील दोन अशी एकूण १४ केंद्र क्रिटीकल घोषित करण्यात आली आहेत. मतदानाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक, दोन अतिरिक्त पोलीस अधीक्षक, ९ उप विभागीय पोलीस अधिकारी, १८ पोलीस निरीक्षक, १८२ पोलीस उपनिरीक्षक, दोन हजार ६०२ पोलीस शिपाई, ४९५ नवीन भरती झालेले पोलीस, एक हजार ११७ होमगार्ड व ४६ नागरी सुरक्षा विभागाचे स्वयंसेवक याना तैनात करण्यात आले आहेत. मतदानासाठी दोन हजार ७३७ मतदान केंद्र अध्यक्ष, सात हजार ७३७ मतदान अधिकारी व दोन हजार ३०८ शिपाई यांचा फौज फाटा कार्यरत राहणार आहे.सर्व मतदारांना २०९७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे मार्फत मतदार चिठ्ठयांचे वाटप करण्यात येत आहे. मतदान झाल्यानंतर इव्हीएम व व्हीव्हीपीएटी मशिन संबधित विधानसभा मतदार संघ मुख्यालयाच्या स्ट्राँग रु ममध्ये जमा करण्यात येतील व त्यांनतर कडक पोलिस बंदोबस्तामध्ये ही मशिन पालघर येथील सूर्या कॉलनी मधील जिल्हा स्ट्राँग रु ममध्ये जमा करण्यात येतील.मतपेट्या राहणार तीन दिवस स्ट्राँग रुममध्येमतदान सोमवार दि २८ मे रोजी दिवशी सकाळी ७ ते सायं ६ वाजेपर्यत तर मतमोजीणी दि. ३१/५/२०१८ सकाळी ८.०० वाजता सुरु होणार आहे. मतदान प्रक्रीया शांतपणे व यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन व इतर सर्व यंत्रणा सुसज्ज असून सर्व मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.३१ मे रोजी पालघर येथे होणाऱ्या मतमोजणीसाठी सहा विधानसभा क्षेत्रांकरीता प्रत्येकी १४ अशी एकूण ८४ मोजणी टेबल मांडण्यात येणार आहेत. या प्रत्येक टेबल वर सुपरवायझर, सहाय्यक व मायक्र ो आॅब्झर्व्हवर तसेच त्यांच्या जोडीला समन्वय साधणारे, डेटा एन्ट्री कर्मचारी असे सुमारे ६०० अधिकारी - कर्मचारी कार्यरत रहातील अशी माहिती त्यांनी दिली.

टॅग्स :Palghar bypoll 2018पालघर पोटनिवडणूक 2018Electionनिवडणूकnewsबातम्या