टंचाईग्रस्त गावात वॉटर व्हीलचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 06:08 AM2019-01-11T06:08:43+5:302019-01-11T06:08:59+5:30

रुरल मेनिया संस्थेचा पुढाकार : आदिवासीबांधवांना केली मदत

Distribution of water wheel in scarcity-hit village | टंचाईग्रस्त गावात वॉटर व्हीलचे वाटप

टंचाईग्रस्त गावात वॉटर व्हीलचे वाटप

googlenewsNext

जव्हार : गेली दोन वर्षे जिल्हाभरात मुबलक पाऊस झाला होता. त्यामुळे दुष्काळ हा शब्द जनतेला आठवला नाही. यंदा मात्र पावसाने दुष्काळाची आठवण करून दिली आहे. जिल्ह्यातील जनतेचा घसा कोरडा होत असून जव्हार तालुक्यात रुरल मेनिया या संस्थेच्या माध्यमातून त्यांची तहान भागविली जात आहे.

संस्थेच्या अध्यक्षा श्मालती राय यांनी तालुक्यातील केळीचापाडा, आळीवमाळ, आपटळे व चोथ्याचीवाडी ही चार गावे दत्तक घेतली असून त्यांनी या गावांसाठी ३५ वॉटरव्हील चे वाटप केले आहे. तसेच आणखी ६५ वॉटरव्हील वाटप करण्यात येणार आहेत. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई भासू लागली आहे. अनेक गावांमध्ये पाणी पुरवठ्याच्या कोणत्याही योजना नसल्याने गावापासून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे. गावातील महिला आणि बालके गावापासून दोन ते तीन किलोमीटर वरून चालत जाऊन पाणी आणतात. डोक्यावर पाण्याचे दोन हंडे व कमरेवर एक हंडा अशा परिस्थितीत गावातील महिलांना दूरवरून पाणी आणावे लागत असल्या कारणाने त्यांना मानेचे व कमरेचे विकार जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे महिलांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जनतेचा घसा कोरडा होत असून त्यांना रुरल मेनिया या संस्थेचा मोठा आधार वाटू लागला आहे. तसेच संस्थेच्या माध्यमातून नैसिर्गक पाणी साठा करण्यासाठी गावकऱ्यांना पंधरा टँकर देण्यात आले आहेत.

यंदा सरासरीपेक्षा पाऊस कमी झाल्याने आॅगस्ट-सप्टेंबर महिन्यापासूनच पाणीटंचाईची झळ जाणवू लागली आहे. त्यामुळे गावातील महिला व बालकांना दूरवरून पाणी आणावे लागत होते. आमच्या रु रल मेनिया या संस्थेच्या माध्यमातून गावकºयांना वॉटरव्हील चे वाटप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांना पाणी आणणे सोपे झाले आहे. तसेच आणखी काही गावांमध्ये वॉटरव्हील वाटप करण्यात येणार आहे.
- मालती राय, अध्यक्ष रु रल मेनिया या संस्था

यंदा पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे गावामध्ये जवळपास कुठेही पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने आम्हाला दूरवरून पाणी आणावे लागत होते. परंतु रु रल मेनिया या संस्थेच्या माध्यमातून आम्हाला वॉटरव्हील मिळाल्याने दूरवरून पाणी आणणे सोपे झाले आहे.
- ललीत ठोंबरे, नागरिक

Web Title: Distribution of water wheel in scarcity-hit village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.