शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

जिल्हा हागणदारीमुक्तीचा मंत्र्याकडून गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 01:04 IST

जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर

पालघर : जिल्हा हागणदारी मुक्तीच्या दिशेने जि.प प्रशासनाचे चालविलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून पालघर हा आदिवासी जिल्हा हागणदारीमुक्त झाल्याचे जाहीर झाल्या नंतर पाणी व स्वच्छता विभागाचे मंत्री बबन लोणीकर ह्यांच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर ह्यांनी पुरस्काराचा स्विकारला.जि.प.च्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा ध्यास घेतला होता. ‘शौचालय असेल तरच बोला’ असा फलक आपल्या कार्यालयात लावून त्यांनी हागणदारी मुक्तीसाठी आपण किती संवेदनशील आहोत हे दाखवून दिले होते. २ आॅक्टोबर २०१७ रोजी पालघर जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याची घोषणा शासनाने केली. त्याबद्दल शासनाच्या पाणी व स्वच्छता विभागाचे मंत्री बबन लोणीकर यांच्या हस्ते मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी ह्या सन्मानाचा स्वीकार केला.पालघर जिल्ह्यात २०१२ च्या पायाभूत सर्वेक्षणानुसार ग्रामपंचायत, नगरपालिका क्षेत्रात शौचालय नसलेल्या कुटुंबाची संख्या १ लाख ३३ हजार १५२ इतकी होती. २०१४-१५ मध्ये १४ हजार १६३ शौचालय, २०१५-१६ मध्ये १४ हजार १६१ शौचालय, २०१६-१७ मध्ये ७० हजार २६० शौचालये आणि २०१७-१८ मध्ये २४ हजार ०८८ इतक्या शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात जिल्हा परिषदेला यश मिळाले. तसेच ९ हजार ०५ कुटुंबे सामुदायीक व सार्वजनिक शौचालयचा वापर करत आहे. जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये ५८ ग्रामपंचायती, २०१६-१७ मध्ये १०३ ग्रामपंचायती आणि २०१७-१८ मध्ये ११ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त घोषित करण्यात आल्या.या मोहिमेला दुर्गम भागापर्यंत पोहोचण्यासाठी विभागाला विशेष प्रयत्न करावे लागले. अजुनही काही वाढीव कुटूंबे तसेच आदिवासी लोकसंख्या असलेल्या पालघर जिल्ह्यात लोकांना शौचालयाचा वापर करण्यासाठी अनके विशेष उपक्र म सातत्याने राबविण्यात भर द्यावा लागणार असला तरी किनारपट्टीवरील गावातून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने तेथे अधिक जोमाने प्रबोधन करावे लागणार आहे. या कार्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पाणी व स्वच्छता विभागच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी संघरत्ना खिल्लारे यांनी प्ररिश्रम घेतले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBabanrao Looneykarबबनराव लोणीकर