शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

तारापूरच्या उद्याेगांना सांडपाणी साेडण्यास दहा दिवस मनाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2020 03:04 IST

Tarapur News : तारापूर एमआयडीसीतील जुना २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणीप्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) दुरुस्ती व मोठ्या प्रमाणात साठलेला स्लज काढण्याचे काम हाती घेतले आहे.

बोईसर - तारापूर एमआयडीसीतील जुना २५ एमएलडी क्षमतेच्या सामुदायिक सांडपाणीप्रक्रिया केंद्राच्या (सीईटीपी) दुरुस्ती व मोठ्या प्रमाणात साठलेला स्लज काढण्याचे काम हाती घेतले आहे. या कामासाठी तेथे उद्योगातून सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी साेडण्यात येऊ नये म्हणून सोमवारपासून सीईटीपीच्या ग्रॅव्हिटी लाइनला जोडलेले सुमारे २५० उद्योगांमधील सांडपाणी पुढील दहा दिवस सीईटीपीमध्ये सोडू नये, असे निर्देश तारापूर एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन सोसायटी (टीईपीएस) ने या उद्योगांना दिले आहेत. यामुळे या कंपन्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.टीईपीएसने उद्योजक व त्यांच्या प्रतिनिधींची ३ डिसेंबरला बैठक झाली. सांडपाणी बंद करण्यासंदर्भात घेतलेला निर्णय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे संयुक्त संचालक डॉ. सोनटक्के यांच्या निर्देशांनुसार टीईपीएसने नाेटीस काढून सांडपाणी न सोडण्यासंदर्भात आदेश काढले आहेत. यामध्ये झोन ३ - एल, एम आणि एन तसेच झाेन ४च्या के, टी आणि डब्ल्यूपीटी आणि प्लॉट नं. ई ५३ पासून ई १२३ पर्यंत उद्योगांचा समावेश आहे. यादरम्यान कुणी सांडपाणी सोडताना आढळल्यास त्या उद्योगाला टीईपीएस-सीईटीपीकडून रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.तारापूरमधील २५ एमएलडी क्षमतेच्या ‘सीईटीपी’मध्ये साचलेला स्लज तो पूर्ण काढून स्वच्छ केल्यानंतर सीईटीपीमधील सांडपाणी प्रक्रिया करण्याची क्षमता वाढून तो प्रकल्प व्यवस्थित चालणार आहे. मात्र, राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी)च्या कमिटीच्या निर्देशानुसार तारापूरच्या उद्योगांमधील प्रदूषणासंदर्भात तपासणीसाठी विशेष सर्वेक्षण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने सुरू केले आहे. या सर्वेक्षणाच्या कामावरही सीईटीपीच्या दुरुस्तीच्या कामाचा परिणाम हाेणार आहे. जुना २५ एमएलडी क्षमतेच्या सीईटीपीच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते लवकर होण्यासाठी हा निर्णय ‘टीईपीएस’ने घेतला असून त्याचे काम प्रगतिपथावर आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक स्वतःहून सहभाग घेऊन रात्रंदिवस पाहणी करत आहेत.- डॉ. राजेंद्र राजपूत, प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,  ठाणे विभाग

टॅग्स :pollutionप्रदूषण