शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
14
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
15
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
16
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
17
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
18
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
19
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा
20
गोरी दिसण्यासाठी काय नाही केलं, शेवटी देवाकडे नवस केला अन् मग...; 'झांसी की रानी' फेम अभिनेत्रीचा स्ट्रगल

पालघरचा विकास करणार- विष्णू सवरा

By admin | Updated: June 15, 2016 00:53 IST

नुकतेच पालक मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील पत्रकारांची संवादसाधून गेली दीड वर्षात भाजप सरकारने केल्याल्या कामाचा आढावा पत्रकारा समोर सादर केला.

विक्रमगड : नुकतेच पालक मंत्री विष्णू सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील पत्रकारांची संवादसाधून गेली दीड वर्षात भाजप सरकारने केल्याल्या कामाचा आढावा पत्रकारा समोर सादर केला. या वेळी मराठी पत्रकार संघाची पालघर जिल्ह्याच्या विकासाची भूमिका संघटनेचे पदाधिकारी संजीव जोशी यांनी विषद केली,माझे लक्ष पालकमंत्री म्हणून पालघर जिल्ह्यावर राहणार असून,पत्रकाराचे सहकार्य व मार्गदर्शन घेऊन नव्या पालघर जिल्ह्याला राज्यात एक नंबरवर आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सवरा यांनी सागितले.आपल्या सरकारने दीड वर्षाच्या काळात सामान्य नागरिक, शेतकरी,आदिवासी, छोटे व्यवसायीक या सर्वासाठी उत्तम कार्य केले असून केंद्र-आणि राज्य सरकारच्या योजना लोकाभिमुख करण्यावर माझा भर होता. पेसा कायद्या अंतर्गत अनुसूचित क्षेत्रासाठी पाच टक्के निधी देऊन ग्रामीण विकासाला गती देण्यात आली आहे. विकास कामात आचारसंहिता आड येत गेल्याने काम दिसत नाही.त्यात नामांकित शाळांमध्ये २५ हजार विद्यारर्थ्यांना मोफत प्रवेश,जात-पडताळणी आॅनलाइन, कुपोषण निर्मूलनासाठी अमृत आहार योजना,आदिवासी कला-परंपरा साठी आदिवासी हाट योजना, एकलव्य क्रीडा योजना, आदर्श ग्राम योजना, शासकीय आश्रम शाळा बांधकाम विभागासाठी स्वतंत्र कक्ष, विशेष म्हणजे पालघर जिल्ह्यासाठी ४४० हेक्टर जागा आधिग्रहित करण्यात आली आहे.जिल्ह्यातील परिवहनासाठी रस्त्याचे जाळे, अनेक पुलांची निर्मिती, उधोग क्षेत्रासाठी ५२ कोटी रु. मंजूर,जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी अधिक कार्य अशी त्यांनी कामांची जंत्री सादर केली.मी वसुरी हे गाव दत्तक घेतले असून या बाबतचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. मराठी पत्रकार संघाकडून एक गाव दत्तक घेण्यात येणार आहे, आश्रमशाळासाठी स्वतंत्र बांधकाम विभागाची स्थापना केली आहे. सध्या पालघर जिल्यात ५५ कार्यालये नाहीत, पॅटर्न तयार आहे.त्या साठी लवकरात लवकर कर्मचारी भरती होणार आहे, बोईसर येथे २६ एकारात क्रीडा प्रबोधिनी साकारणार आहोत. पालघर जिल्ह्याकडे जाणारे रस्ते चौपदरी करणार आहोत, अशीही माहिती त्यांनी दिली. (वार्ताहर)कोणती कामे मंजूर, त्यासाठी निधी किती?- पालघर जिल्ह्यासाठी २०१५ -१६ अर्थसंकल्पीय ३८२ कामांसाठी ९७ कोटी मंजूर. ६९९ मंजूर कामासाठी १५६ कोटीच्या वर निधी प्राप्त.- २०१६-१७ मध्ये आदिवासी विकास विभागासाठी ४०८ कामे मंजूर त्या साठी ११५ कोटी निधी प्राप्त, ३४८ कामे मंजूर त्यासाठी ३८ कोटी निधी प्राप्त. - ठक्कर बाप्पा योजने अंतर्गत ८५५ कामे मंजूर त्यासाठी ८६ कोटीचा निधी प्राप्त, सा.बां कामासाठी ११२ कामे मंजूर, ५१३ कोटी निधी प्राप्त पालघर जिल्ह्यासाठी एकूण २४२२ कामे मंजूर त्याकरीता ९११ कोटी ९ लाखाचा निधी प्राप्त झाल्याचे पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे आदीवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी यावेळी सागितले.