शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दत्तक घेतली जव्हार तालुक्यातील तीन गावं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 18:55 IST

तालुक्यातील दुर्गम भागातील देहरे, कोगदा व पाथर्डी ही गावे मी दत्तक घेत असून येथे विविध योजना पोहोचाव्यात म्हणून व्यक्तिश: लक्ष देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनी दिले. त्या येथील ग्रामीण भागाच्या आढावा दौऱ्यावर आल्या होत्या.

जव्हार : तालुक्यातील दुर्गम भागातील देहरे, कोगदा व पाथर्डी ही गावे मी दत्तक घेत असून येथे विविध योजना पोहोचाव्यात म्हणून व्यक्तिश: लक्ष देणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांच्या पत्नी व प्रसिद्ध गायिका अमृता फडणवीस यांनी दिले. त्या येथील ग्रामीण भागाच्या आढावा दौऱ्यावर आल्या होत्या.प्रथम त्यांनी देहरेगाव व आश्रमशाळेला भेट देऊन तेथील विद्यार्थी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. तेथून त्या जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. तेथे त्यांनी कुपोषित बालकांची विचारपूस करून समस्या जाणून घेतल्या. तेथून त्या जव्हार येथील साईमहल येथील स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण), पालघर जिल्हा परिषद, जव्हार पंचायत समिती आणि दिव्यज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मासिकपाळी व्यवस्थापन व अस्मिता योजना जनजागृती कार्यशाळेला भेट दिली. त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी योजनेबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच, जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनीही कुपोषण कमी करून रोजगारवाढीकरिता विविध योजना येथे राबवल्या जात असल्याचे सांगितले.यावेळी उत्कृष्ट अंगणवाडीसेविका म्हणून काम केलेल्या सेविकांना किट व प्रमाणपत्र देऊन व अस्मिता योजनेंतर्गत पुरवठादार म्हणून रजिस्ट्रेशन केलेल्या तालुक्यातील सात बचत गटांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी गेल्या सात महिन्यांपासून बालमृत्यू आणि मातांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच, जिल्ह्यातील कातकरी समाजाचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी कातकरी उत्थान कार्यक्रम सुरू केला आहे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

जव्हार हनुमान पॉइंट येथील कौशल्या विकास विभाग व अनिता डोंगरे या संस्थेमार्फत चालणाºया फॅशन डिझाइन केंद्राला त्यांनी भेट दिली. त्यावेळी या योजनेच्या प्रकल्प अधिकारी पवनीत कौर यांनी केंद्रात शिकवल्या जाणाºया व तेथील महिलांना मिळणाºया रोजगाराबाबत माहिती दिली. तेथून त्या कुटीर रुग्णालयातील नव्याने उभारलेल्या एसएनसीयू विभागाचे उद्घाटन करून विभागाची पाहणी केली. त्यानंतर, त्या शासकीय कन्या आश्रमशाळा, साकूर येथे विद्यार्थिनींना मासिकपाळी व्यवस्थापन व अस्मिता योजनेची माहिती देऊन तेथील विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिनचे वाटप करण्यात आले.कुपोषण शून्यावर आणणारतालुक्यातील अंगणवाडीसेविकांना कुपोषण कसे कमी करता येईल, याबाबत दिव्यज फाउंडेशनच्या वतीने मार्गदर्शन केले. त्यावेळी मुलांची खरोखर काळजी तुम्ही घेता, त्यामुळे त्यांची खरी माता अंगणवाडीसेविका हीच असते. पालघर जिल्हा कुपोषित बालकांमुळे नेहमीच चर्चेला येत आहे. तसेच कुपोषणाचे ४० टक्के प्रमाण शून्यावर आणण्यासाठी मी आणि तुम्ही मिळून सर्वांनी कुपोषणाचा प्रश्न कायमचा नष्ट करायचा आहे. यासाठी मी आपणास नेहमीच मदत करण्यास तयार असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसVasai Virarवसई विरार