शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
4
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
5
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
7
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
8
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
9
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
10
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
11
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
12
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
13
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
14
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
15
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
16
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
17
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास
18
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
19
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
20
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे

बिलो रेट निविदांमुळे दर्जात घट; पालघर जिल्हा परिषदेत खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2018 00:34 IST

जिल्हा परिषदेतील ३०५४ च्या ११० कामांपैकी ७४ कामांच्या निविदा संबंधित ठेकेदारांनी मंजूर दरापेक्षा सुमारे २५ ते ३० टक्के ‘बिलो रेट’ ने भरण्यात आल्याने या कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा ठेकेदारांकडून बांधकाम विभागाने कामाच्या दर्जासंदर्भातील हमीपत्रे मागितली आहेत.

- हितेंन नाईकपालघर : जिल्हा परिषदेतील ३०५४ च्या ११० कामांपैकी ७४ कामांच्या निविदा संबंधित ठेकेदारांनी मंजूर दरापेक्षा सुमारे २५ ते ३० टक्के ‘बिलो रेट’ ने भरण्यात आल्याने या कामांच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण झाला असून अशा ठेकेदारांकडून बांधकाम विभागाने कामाच्या दर्जासंदर्भातील हमीपत्रे मागितली आहेत.तीन लाख रुपयांच्या वरील सर्व कामे ई -टेंडरिंग पद्धतीने करण्यात येत असल्याने शासनाचा फायदा होत आहे. यामुळे कामात पारदर्शकता आल्याचे शासकीय पातळीवरून भासवले जात असले तरी नव्याने बांधलेले रस्ते अल्पावधीतच उखडले जात आहेत . त्यामुळे पारदर्शकतेच्या नावाने कामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शासन पारदर्शकतेचा धिंडोरा पिटत असतांना ठक्करबाप्पा योजनेतील रस्त्यांच्या कामात विक्रमगड तालुक्यात मोठा भ्रष्टाचार झाला असून आयआयटीच्या सर्वेक्षणाद्वारे अहवाल प्राप्त होऊनही दोषी विरोधात कारवाई केली जात नसल्याने अशा कमी दराच्या कामाची गुणवत्ता टिकणार कशी ? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला असून अशा निकृष्ट कामविरोधात तक्रारी करूनही कारवाई होत नाही. जिल्हा परिषद बांधकामाची कामे असो किवा सार्वजनिक बांधकाम विभागाची असोत, त्यांच्या निविदा सुशिक्षित बेरोजगार अभियंते किवा मजूर सहकारी संस्थांकडून भरल्या जात आहेत परंतु या स्पर्धेत आपल्यालाच कामे मिळायला हवीत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून अंदाजपत्रकाच्या १० ते २० टक्के कमी दराने या निविदा भरल्या जात असल्याने एवढ्या कमी दरानी हि कामे कशी होणार? तसेच त्यांची गुणवत्ता कशी राखली जाणार? या बाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यातच टक्केवारी चे गणित ही ठेकेदाराला सोडवावे लागणार असल्याने इतक्या कमी रक्कमेत रस्त्याची गुणवत्ता राखली जाण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. याबाबत संबंधित विभागाच्या इंजिनिअरना अनेक प्रश्नाच्या ससेमिऱ्याला सामोरे जावे लागणार आहे. अंदाजपत्रका प्रमाणे ठेकेदार कडून कामे कशी करून घ्यायची, गुणवत्ता कशी राखायची असा प्रश्न इंजिनिअरांना पडला आहे.जिल्हापरिषद बाधकाम विभाग अंतर्गत ३०५४ च्या योजने अंतर्गत विक्र मगड तालुक्यात जवळपास २० ते ३० कामे मंजूर झाली असून बºयाच कामांना २० ते २५ टक्के कमी दराने मंजूरी दिली असून त्यापैकी खडकी सारशी रस्त्याची निविदा ३७ लाख १७ हजाराची असून ती २१.२८ टक्के कमी दराने, चौधरीपाडा ते डोल्हारी बु. ची निविदा २२ लाख ४७ हजार २५ टक्के कमी दराने, पोचाडा अधेरी रस्ता १५ लाख १ हजार २९५ रु पये ती निविदा २४.१० टक्के कमी दराने, रा.मा ७३ ते गोंडपाडारस्ता ११ लाख २६ हजार ७७७ रक्कमेची निविदा २४.५० टक्के कमी दराने मंजूर आहेत. पालघर जिल्ह्यात या वर्षात ११० कामे मंजूर असून त्यापैकी ७४ च्या निविदा कामे कमी दराने मंजूर करण्यात आल्या आहेत.एवढ्या कमी दरात काम उत्तम प्रकारे करणार कसे?या संदर्भात बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ठेकेदारांना पाठविलेल्या पत्रात आपली न्यूनतम दराची निविदा मंजूर करण्यात आली असून कार्यारंभ आदेश देण्यापूर्वी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत कळविले आहे.तसेच कमी दराची निविदा असल्याने नव्याने अंदाजपत्रक तयार करून त्यात रक्कमा सिमीत केल्या आहेत. मूळ दर हे राज्य दरसूची नुसार असून साहित्याचे व मजुरीचे दर हे देखील बाजारभावा प्रमाणे आहेत.तरी सुद्धा आपण इतक्या कमी दराने मंजूर झालेले काम कशा पद्धतीने करणार आहात याचा खुलासा सादर करून अंदाजपत्रकानुसार गुणवत्तापूर्वक कसे करणार आहात.या बाबतचे हमीपत्र मागविले आहे.नियमानुसार कामे करणार, ती निकृष्ट झाल्यास ठेकेदारांच्या डिपॉझिटमधूून ती उत्तमप्रकारे करून घेणार.- धुमाळ, कार्यकारी अभियंता, जि.प. पालघर

टॅग्स :palgharपालघर