शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने उत्पन्नात होणार घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 11:35 PM

भात पीक कापणीच्या अवस्थेत : तालुक्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड

लोकमत न्यूज नेटवर्क डहाणू/बोर्डी : तालुक्यातील डहाणू, कासा आणि वाणगाव या तीन्लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू/बोर्डी : तालुक्यातील डहाणू, कासा आणि वाणगाव या तीनही कृषी मंडळात खरिपात १५ हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. यंदा या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. काही भागात हळवे पीक कापणीला आले असून शेतातील उभ्या पिकावर खोडकिडा आणि लष्करी अळीमुळे या रोगाची लागण होऊन उत्पादन घटण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे.डहाणू तालुक्यातील भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची बाब कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राच्या निदर्शनास आल्यानंतर, तेथील शास्त्रज्ञांनी क्षेत्र भेटीच्या माध्यमातून पिकांची पाहणी केली. यावेळी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्याचे कीटक शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.सध्या भात पीक कापणीच्या अवस्थेत आहे. ही लष्करी अळी कमी वेळेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. भात पिकामध्ये मुख्यत: लोंबी किंवा त्याच्या कणसावर हल्ला करते. त्यामुळे जमिनीवर मोठ्या प्रमाणात भाताचे दाणे पडलेले दिसतात. तसेच अळीची विष्टा मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडलेली दिसून येते.पीक पक्व अवस्थेत असल्याने कोणतेही रासायनिक कीटकनाशक फवारण्याची शिफारस करता येत नाही. मात्र ही अळी एक शेत संपल्यावर शेजारच्या शेतात जाते. याकरिता बांधावर क्विनालफोस डस्ट किंवा मिथाईल पेराथिआॅन डस्ट धुरळल्यास अळीचा प्रादुर्भाव शेजारच्या शेताला होण्यापासून थांबवता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.ही कीड समजून घेऊन वेळीच योग्य उपयोजना केल्या तर नुकसान होणार नाही. याकरिता लष्करी अळीसाठीचा कामगंध सापळा प्रती एकर सहा याप्रमाणे तर प्रकाश सापळा एक लावणे आवश्यक आहे. तर पक्षी थांबे १० लावणे योग्य ठरेल. कारण ही अळी सहज पक्षांच्या भक्ष्यस्थानी येऊन नैसर्गिक नियंत्रण मिळते.म्हणून पक्षी आकृष्ट करणे आणि त्यांना भात शेतात बसण्यास जागा उपलब्ध करु न देणे गरजेचे आहे. ट्रायकोकार्डचा वापर ४ कार्ड प्रती एकर (८० हजार अंडी), प्रादुर्भाव दिसू लागल्यास बिवेरिया बॅसियाना हे जैविक कीटकनाशक ५ ग्राम प्रति लीटर पाण्यासोबत फवारावे. या पद्धतीने पुढील वर्षाचे नियोजन केल्यास शेतकऱ्याला त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.ाही कृषी मंडळात खरिपात १५ हजार हेक्टर क्षेत्रात भाताची लागवड केली जाते. यंदा या पिकावर रोगाचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. काही भागात हळवे पीक कापणीला आले असून शेतातील उभ्या पिकावर खोडकिडा आणि लष्करी अळीमुळे या रोगाची लागण होऊन उत्पादन घटण्याची भीती उत्पादकांनी व्यक्त केली आहे.डहाणू तालुक्यातील भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याची बाब कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राच्या निदर्शनास आल्यानंतर, तेथील शास्त्रज्ञांनी क्षेत्र भेटीच्या माध्यमातून पिकांची पाहणी केली. यावेळी लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळल्याचे कीटक शास्त्रज्ञ उत्तम सहाणे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.सध्या भात पीक कापणीच्या अवस्थेत आहे. ही लष्करी अळी कमी वेळेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करते. भात पिकामध्ये मुख्यत: लोंबी किंवा त्याच्या कणसावर हल्ला करते. त्यामुळे जमिनीवर मोठ्या प्रमाणात भाताचे दाणे पडलेले दिसतात. तसेच अळीची विष्टा मोठ्या प्रमाणात जमिनीवर पडलेली दिसून येते.पीक पक्व अवस्थेत असल्याने कोणतेही रासायनिक कीटकनाशक फवारण्याची शिफारस करता येत नाही. मात्र ही अळी एक शेत संपल्यावर शेजारच्या शेतात जाते. याकरिता बांधावर क्विनालफोस डस्ट किंवा मिथाईल पेराथिआॅन डस्ट धुरळल्यास अळीचा प्रादुर्भाव शेजारच्या शेताला होण्यापासून थांबवता येईल, अशी माहिती त्यांनी दिली.ही कीड समजून घेऊन वेळीच योग्य उपयोजना केल्या तर नुकसान होणार नाही. याकरिता लष्करी अळीसाठीचा कामगंध सापळा प्रती एकर सहा याप्रमाणे तर प्रकाश सापळा एक लावणे आवश्यक आहे. तर पक्षी थांबे १० लावणे योग्य ठरेल. कारण ही अळी सहज पक्षांच्या भक्ष्यस्थानी येऊन नैसर्गिक नियंत्रण मिळते.म्हणून पक्षी आकृष्ट करणे आणि त्यांना भात शेतात बसण्यास जागा उपलब्ध करु न देणे गरजेचे आहे. ट्रायकोकार्डचा वापर ४ कार्ड प्रती एकर (८० हजार अंडी), प्रादुर्भाव दिसू लागल्यास बिवेरिया बॅसियाना हे जैविक कीटकनाशक ५ ग्राम प्रति लीटर पाण्यासोबत फवारावे. या पद्धतीने पुढील वर्षाचे नियोजन केल्यास शेतकºयाला त्रास होणार नाही, असे ते म्हणाले.