शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

४० टक्क्यांनी फटाक्यांच्या व्यवसायामध्ये झाली घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2019 01:15 IST

मंदी, पावसाचा फटका, दिवाळीच्या काळात दुकाने रात्रंदिवस राहतात सुरू

वाडा : वाडा शहराला आता गेल्या काही वर्षांपासून फटाक्यांचे शहर अशी नवी ओळख मिळाली असून येथे फटाक्यांची मोठी उलाढाल होत असून दिवसेंदिवस ती वाढतच आहे. मात्र यावर्षी मंदीचे सावट असतानाच विधानसभा निवडणूक आली. त्यानंतर परतीचा पाऊस गेल्या काही दिवसांपासून पडत असल्याने फटाक्याचा व्यवसाय यावर्षी ३५ ते ४० टक्यांनी कमी झाला असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठाणे, रायगड, रत्नागिरी, नाशिक, मुंबई येथे फटाक्यांचे घाऊक आणि किरकोळ विक्रते असूनही येथील फटाके व्यापाºयांकडील वाजवी दरामुळे विक्रेत्यांचा ओढा वाडा शहराकडेच असतो. त्यामुळे घाऊक व्यापाºयांची एकच गर्दी व्हायची. मात्र यावर्षी मंदीचे सावट त्यात निवडणुका व आता पाऊस यामुळे आमच्या व्यवसायात कमालीची घट झाली असल्याचे व्यापाºयांनी सांगितले.

वाडा शहरात प्रितम सेल्स एजन्सी, दिलीप ट्रेडर्स, मनोरे ट्रेडर्स, सिद्धिविनायक ट्रेडर्स, पातकर ट्रेडर्स, नंदकुमार ट्रेडर्स आदी घाऊक फटाक्यांची दुकाने असून दिवाळीच्या वेळेस ही दुकाने रात्रंदिवस सुरू असतात. तमिळनाडू येथील शिवाकाशी येथे फटाक्यांचे उत्पादन केले जाते. तेथून थेट फटाके येथील व्यापारी आणतात.

सध्या फॅन्सी फटाक्यांची धूम असून त्याचीच मागणी जास्त आहे. फॅन्सी फटाके ५० रूपयांपासून २००० च्या वर आहे. यामध्ये शोभेचे फटाके, पाऊस, चक्री, फुलबाज्या, रॉकेट, फॅन्सी शॉट,फॅन्सी मल्टीकलर शॉट,आकाशात उडणारे फॅन्सी शॉट, डबल बार, ट्रिपल बार, कार्टून, नागगोळी , चिटपुट, किटकॅट, अ‍ॅमबॉम्ब ,लवंगी, आकाशातील रंगीबेरंगी फटाके, सुतळी बॉम्ब,जमीनचक्र , फटाकडी आदी विक्रीसाठी आहेत.स्वीपकार्डची व्यवस्था

फटाके व्यवसाय हा रोखीने करण्याऐवजी आॅनलाईन करावा यासाठी व्यापाºयांनी स्वीपकार्डची व्यवस्था केली आहे. त्यामुळे स्वीपकार्डद्वारे ग्राहक व्यवहार करू शकतात.

सुरक्षिततेसाठी नियंत्रण यंत्र

कुठलीही दुर्घटना घडू नये म्हणून प्रत्येक दुकानात फायर नियंत्रण यंत्र बसवण्यात आले आहे. तसेच दुकानासभोवताली पाण्याची पाइपलाइन फिरवण्यात आली आहे. तसेच दुकानासमोर गाड्या उभ्या करण्याची व्यवस्था केली आहे.

फटाक्यांचे दरपाऊस, चक्रि : २३ रूपयांपासून ९० रूपयांपर्यतफुलबाजे : ३५ पासून ९० रूपयांपर्यतरॉकेट : ५० पासून १२० रूपयांपर्यतफॅन्सी शॉट : ३८० पासून २००० हजारा पर्यंतमल्टी कलर शॉट : ३५ पासून १५० पर्यंतबटर फ्लाय : २०० ते २५०नागगोळी : १० ते १५ रूपयेआपटी बॉम्ब : १० ते १५ रूपयेडबल शॉट : ४० ते ५०, बंदूक : ५० ते २००

टॅग्स :Diwaliदिवाळीfire crackerफटाके