शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

उपचार न मिळाल्याने गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, पालघर जिल्ह्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2024 6:38 AM

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

- रवींद्र साळवे

मोखाडा : पालघर जिल्ह्यात दुर्गम भागातील आरोग्य व्यवस्था सलाईनवर असल्याचे पुन्हा उघड झाले असून मोखाडा तालुक्यातील गर्भवती आदिवासी महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने पोटातील बाळासह तिचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि वेळेत उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. महिलेच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचे मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भरतकुमार महाले यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

मोखाडापासून २० कि.मी.वरील शिरसगाव ग्रामपंचायतीअंतर्गत येणाऱ्या गणेशवाडी येथील गर्भवती महिला रूपाली भाऊ रोज (वय २५) हिला आठव्या महिन्यातच प्रसूतीच्या कळा रविवारी सुरू झाल्या. त्यामुळे तिला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले; परंतु, तेथे डॉक्टरांनी कोणतेही उपचार केले नसल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. 

...म्हणून नाशिकला पाठवले डॉक्टरांनी उपचार न केल्याने रूपाली हिला घरी नेण्यात आले. सोमवारी सकाळी तिला मोखाडा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु, त्यानंतर तिच्या बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याने तिला नाशिक येथे नेण्यास सांगण्यात आले, अशी माहिती मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. भरतकुमार महाले यांनी दिली. तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तीन-चार दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी गर्भवती रुपाली हिचा मृत्यू झाला. 

सुविधा नसल्याने वर्षभरात २० मातांचा मृत्यू, २९४ बालमृत्यू मोखाड्यातील आदिवासी भागात रस्ता, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. आजही येथील आदिवासी गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी दवाखान्यात आणण्यासाठी डोली करून ७ ते ८ किलोमीटरची पायपीट करावी लागते.वर्षभरात चांगली आरोग्य सेवा न मिळाल्याने २० माता आणि २९४ बालमृत्यू झाले आहेत.

- मोखाडा ग्रामीण रुग्णालयात वेळेत योग्य उपचार मिळाले असते तर माझी पत्नी व बाळ दोन्ही वाचले असते. या घटनेला मोखाडा ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर व संबंधित जबाबदार आहेत.  - भाऊ रोज, रुपालीचा पती

टॅग्स :palgharपालघर